तिसऱ्या टेस्टपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का! स्टार फलंदाजाला दुखापत, सामन्याला मुकणार?”

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 5 सामन्यांची टेस्ट सीरिज खेळवली जात आहे. रविवारी बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा मोठा पराभव केला. 10 विकेट्सने एडिलेड येथील टेस्ट सामना जिंकून ऑस्ट्रेलियाने सीरिजमध्ये 1-1 ने बरोबरी साधली. WTC फायनलमध्ये पोहोचण्यासाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोघांना पुढील सामना जिंकणं महत्वाचं असणार आहे. मात्र गाबा टेस्टला केवळ तीन दिवस शिल्लक असताना टीम इंडियाच्या स्टार फलंदाज आणि विकेटकिपरला दुखापत झाली आहे.

सध्या टीम इंडिया बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून सीरिजमधील तिसरा सामना ब्रिस्बेनच्या प्रसिद्ध गाबा स्टेडियमवर खेळवण्यात येणारा आहे. शनिवारी 14 डिसेंबर पासून हा सामना सुरु होईल. या सामन्यासाठी टीम इंडियाचे सर्व खेळाडू कसून सराव करत आहेत. मात्र सराव करताना टीम इंडियाचा स्टार विकटकीपर फलंदाज ऋषभ पंतला दुखापत झाली. ज्यामुळे तात्काळ त्याला मैदानाबाहेर नेण्यात आले.

टीम इंडियाचा फलंदाज ऋषभ पंत नेट्समध्ये थ्रोडाऊन स्पेशलिस्ट रघुचा सामना करत होता. मात्र या दरम्यान ऋषभच्या शरीरातील वरच्या भागाला दुखापत झाली आणि तो वेदनेने कळवळत मैदानात बसला. हे पाहून रघु, फिल्डिंग कोच टी दिलीप आणि मेडिकल स्टाफचे मेंबर त्याच्या जवळ आले. काहीकाळ ऋषभ पंतने सराव थांबवला होता मात्र चाहत्यांसाठी आनांदाची बातमी ही की थोड्यावेळाने त्याने पुन्हा सरावाला सुरुवात केली. त्यामुळे ऋषभची दुखापत फार गंभीर नसल्याचे रिपोर्ट्समधून समोर आले आहे.

टीम इंडियाचा एडिलेड येथे खेळलेल्या टेस्ट सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे टीम इंडियाल आता गाबा येथे होणारा सामना जिंकणं महत्वाचं ठरणार आहे. यासाठी रोहित शर्मा टीम इंडियाच्या प्लेईंग 11 मध्ये महत्वाचे बदल करू शकतो. एडिलेड सामन्यात गोलंदाज हर्षित राणा याला एकही विकेट मिळवणं शक्य झालं नव्हतं. त्यामुळे आर अश्विन, बुमराह, सिराज यांच्या सपोर्टसाठी आकाश दीप याला प्लेईंग 11 मध्ये संधी दिली जाऊ शकते. तसेच रोहित शर्मा हा दुसरा टेस्ट सामन्यात नंबर 6 वर खेळण्यासाठी उतरला होता. मात्र तो फलंदाजीत चांगली कामगिरी करू शकला नाही. त्यामुळे गाबा टेस्टमध्ये तो पुन्हा ओपनिंग करताना दिसू शकतो.

एडिलेड येथे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार दुसरा टेस्ट सामना हा प्रेक्षकांना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स आणि डीडी स्पोर्ट्स या चॅनलवर पाहता येईल. तसेच या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग डिझनी हॉटस्टारवर करण्यात येईल. हा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी 5 वाजून 50 मिनिटांनी सुरु होईल. म्हणजेच याचा टॉस टाइम हा 5 वाजून 20 मिनिटांचा असेल.

हेही वाचा :

थंडी परतणार! येत्या 24 तासात महाराष्ट्रातील वातावरण बदलणार

एक नाही तर तब्बल 9 आयपीओ खुले होणार; पुढील आठवड्यात कमाईची मोठी संधी!

‘विरोधी पक्षाचा पूर्ण सफाया, ६५ वर्षांत असं कधीच घडलं नाही…’, मविआ नेत्याचे सूचक वक्तव्य