15000 चे थेट झाले 25000 रुपये! बजाज फायनान्सनंतर आता पीएन गाडगीळच्या IPO ची हवा

पुण्यातील पीएन गाडगीळ या ज्वेलर्स कंपनीचा आयपीओ(ipo) आज शेअर बाजारावर सूचिबद्ध झाला आहे. विशेष म्हणजे शेअर बाजारावर सूचिबद्ध होताच आयपीओत गुंतवणूक करणारे चांगलेच मालामाल झाले आहेत. या कंपनीचा शेअर आज 74 टक्क्यांच्या प्रीमियमसह लिस्ट झाला आहे. एनएसईवर या कंपनीचा शेअर 830 रुपयांवर तर बीएसईवर हा शेअर 834 रुपयांवर लिस्ट झाला आहे. पीएन गाडगीळ या कंपनीच्या आयपीओची इश्यू प्राईज 480 रुपये प्रती शेअर होती.

या आयपीओसाठी(ipo) किरकोळ गुंतवणूकदारांना कमीत कमी 14,880 रुपयांची गुंतवणूक करावी लागणार होती. म्हणजेच या आयपीओचा एक लॉट 14880 रुपयांना होता. ही कंपनी आता शेअर बाजारावर सूचिबद्ध झाली आहे. त्यानंतर आता BSE वर प्रत्येक लॉटमागे गुंतवणूकदारांना 10974 रुपयांचा फायदा झाला आहे. तर एनएसईवर प्रत्येक लॉटमागे गुंतवणूकदारांना 10850 रुपयांचा फायदा झाला आहे.

पीएन गाडगीळ हा शेअर सूचिबद्ध होण्याआधी ग्रे मार्केट प्रिमियमध्ये किरकोळ सुधारणा झाली होती. ही कंपनी ग्रे मार्केटमध्ये 300-305 रुपयांच्या प्रीमियमवर (जीएमपी) ट्रेड करत होती. ग्रे मार्केटवरील स्थिती पाहता ही कंपनी प्रत्यक्ष शेअर बाजारावर सूचिबद्ध झाल्यानंतर कमीत कमी 63-65 टक्के नफा होईल असा अंदाज लावला जात होता. मात्र या कंपनीने शेअर बाजारावर धडाकेबाज एन्ट्री घेतली. गुंतवणूकदारांना अपेक्षेपक्षा जास्त नफा झाला.

पीएन गाडगीळ कंपनी ही एक ज्वेलर्स कंपनी आहे. या कंपनीकडून सोने, चांदी, हिऱ्याचे जागिने विकले जातात. या कंपनीकडे लेटेस्ट डिझाईन्स तसेच पारंपरिक दागिन्यांचे कलेक्शन आहे. ही कंपनी पुण्यात आहे. महाराष्ट्रात ही कंपनी चांगलीच प्रसिद्ध आहे.

पीएन गाडगीळ या आयपीओत 850 कोटी रुपयांचे फ्रेश शेयर विकण्यात आले. तसेच या आयपीओत 52,08,333 शेअर्स हे ऑफर फॉर सेलच्या माध्यमातून विकण्यात आले. या कंपनीने एकूण 1100 कोटी रुपयांचे शेअर्स विकण्यासाठी काढले होते. या कंपनीने एका लॉटमध्ये 31 शेअर्स ठेवले होते.

हेही वाचा:

“साडी नेसणारी पोरगी पाहिजे” म्हणत सूरज चव्हाण लाजला, अभिजीतची मजेशीर प्रतिक्रिया!

Tesla ट्रकने अचानक घेतला पेट; भीषण आग विझवण्यासाठी लागले दोन लाख लिटर पाणी!

बिग बॉस प्रेमींची मागणी: रितेश-निक्कीला पाठिंबा, महेश मांजरेकरांना परत आणा!