एक २३ वर्षीय महिला शिक्षिका(teacher) १३ वर्षीय विद्यार्थ्याला घेऊन पळून गेली होती. हा संपूर्ण प्रकार गुजरातमधील सुरत येथे घडला आहे. विद्यार्थ्याच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी दोघांना पकडले आहे, मात्र महिला शिक्षिकेने पोलिसांना असे काही सांगितले की ते ऐकून पोलिसही थक्क झाले.

गुजरातच्या सुरत जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. येथे एक महिला शिक्षिका आपल्याच विध्यार्थ्याला घेऊन पळून गेली. विद्यार्थ्याच्या वडिलांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी दोघांना गुजरात-राजस्थानच्या शामलाजी सीमेवरून पकडले. महिला शिक्षिकेचे वय २३ वर्षे आहे, तर विद्यार्थ्यांचे वय अवघे १३ वर्षे आहे.
पोलिसांनी तिची चौकशी केली असता पोलिसांना कळले की शिक्षिका पाच महिन्यांची गर्भवती आहे. पोलिसांनी विचारपूस केले असता शिक्षिकेने(teacher) सांगितले की तिच्या पोटात वाढणारे मुलं हे अल्पवयीन मुलांचेच आहे. आता याचा शोध घेण्यासाठी पोलीस डीएनए चाचणी करणार आहेत.
गुजरातच्या सूरत जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी एक २३ वर्षीय महिला शिक्षिका आपल्या १३ वर्षीय विद्यार्थ्याला घेऊन पळून गेली होती. पुण्यातील पर्वत पाटिया परिसरातील ही महिला शिक्षिका गेल्या तीन वर्षांपासून विद्यार्थ्याला शिकवत होती. त्यानंतर एके दिवशी ती त्याला घेऊन पळून गेली.
या घटनेच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये महिला शिक्षिके विद्यार्थ्याला घेऊन जाताना दिसली. या घटनेनंतर विद्यार्थ्याच्या वडिलांनी शिक्षिकेविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला.पोलिसांनी गहाळ व्यक्तीची नोंद करून दोघांचा शोध सुरू केला. गुरुवारी पोलिसांनी दोघांना अरावली जिल्ह्यातील गुजरात-राजस्थानच्या शामलाजी सीमेवरून पकडले. पोलीस दोघांना सूरतला घेऊन आले.

पोलिसांच्या चौकशीत महिला शिक्षिकेने सांगितले की, ती विद्यार्थ्यासह सूरतहून अहमदाबादला गेली होती. त्यानंतर अहमदाबादहून ते दिल्ली, वृंदावन आणि जयपूरला गेले. जयपूरहून परत येताना पोलिसांनी दोघांना शामलाजी सीमेवर पकडले. विद्यार्थ्याच्या वडिलांनी महिला शिक्षिकेवर आपल्या मुलाच्या अपहरणाचा आरोप केला. तपासादरम्यान पोलिसांना कळले की महिला शिक्षिका गर्भवती आहे. जेव्हा पोलिसांनी तिच्या पोटात वाढणाऱ्या मुलाबाबत विचारले, तेव्हा तिने सांगितले की हे मूल अल्पवयीन मुलाचेच आहे.
हे ऐकून पोलीस थक्क झाले. पोलिसांनी सांगितले की, महिला शिक्षिकेच्या(teacher) दाव्याबाबत ते डीएनए चाचणी करणार आहेत. पोलिसांनी विद्यार्थ्याला त्याच्या वडिलांच्या ताब्यात दिले आहे, तर महिला शिक्षिकेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांना संशय आहे की शिक्षिकेचे तिच्या विद्यार्थ्याबाबत खूप आकर्षण होते. ती गेल्या तीन वर्षांपासून त्याला शिकवत होती.
हेही वाचा :
शेतकऱ्यांना कर्जमाफी आश्वासन दिले नाही: अजित पवारांनी हात झटकले
आज अनेक शुभ संयोग; ‘या’ 5 राशींवर देवी लक्ष्मी होणार प्रसन्न, अचानक होणार धनलाभ
राज्यात पुन्हा पावसाचे संकट; विदर्भात आजपासून चार दिवस पावसाचा इशारा