महाराष्ट्रामधील ४० आयटी कंपन्यांनी केलं स्थलांतर..

बड्या आयटी कंपन्यांनी केवळ पुणेच नाहीतर महाराष्ट्र सोडून हैदराबाद, (migrated)चेन्नई, बंगळूर व अन्यत्र स्थलांतर केले आहेआयटी पार्क हिंजवडीत कार्यरत असणाऱ्या एमआयडीसी, पिंपरी-चिंचवड, पुणे महापालिका, स्थानिक ग्रामपंचायती, सार्वजनिक बांधकाम विभाग, पीएमआरडीए, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (एनएचएआय) या सरकारी संस्थांत असलेल्या समन्वयाच्या अभावामुळे गेल्या २५ वर्षात पायाभूत सुविधांचे भक्कम जाळे उभे करण्यास अपयश आले आहे. त्यामुळे ‘आयटी’तील सुमारे ४० कंपन्यांनी त्यांचे प्रकल्प स्थलांतरित केले आहेत, असा दावा परिसरातील उद्योजक व हिंजवडी इंडस्ट्रिअल असोसिएशनने केला आहे.

आतापर्यंत हिंजवडीतील राजीव गांधी इन्फोटेक पार्कमधील बार्कलेस, नाईस, क्रेडिट स्विस, ल्युमीडेक्स यांसारख्या सुमारे २० हून अधिक बड्या आयटी कंपन्यांनी केवळ पुणेच नाहीतर महाराष्ट्र सोडून हैदराबाद, चेन्नई, बंगळूर व अन्यत्र स्थलांतर केले आहे तर वेंचुरा टेक्नॉलॉजी, टी क्यूब सॉफ्टवेअर यांसारख्या लहान कंपन्यांनी हिंजवडी ‘आयटी’ला राम-राम करून बाणेर, खराडी आदी ठिकाणी आपले बस्तान मांडले(migrated)आहे. येत्या काळात आणखी कंपन्या आपले प्रकल्प इतरत्र हलवण्याची शक्यता आहे.

हिंजवडी इंडस्ट्रिअल असोसिएशन एचआयए, प्रशासन तसेच राज्य आणि केंद्रीय स्तरावरील पाठपुराव्यांमुळे काही प्रमाणात का होईना येथील प्रश्न सुटले. मात्र, येथील पर्यायी रस्त्यांचे जाळे उभे न राहिल्याने वाहतूक कोंडीची बिकट समस्या अद्याप सुटू शकली नाही. ठिकठिकाणी साचणारे कचऱ्याचे ढीग, पावसाळ्यात रस्त्यांवर अवतरणारे तळे अशा अनेक लहान-सहान मात्र कंपन्यांना डोईजड झालेल्या समस्यांनी येथील रोजगारावर विपरीत परिणाम होत आहे.

‘आयटी’त सुमारे २५० कंपन्या आहेत. त्यापैकी ५० इंजिनिअरिंग व फार्मा कंपन्या आहेत. यातील सुमारे ८० कंपन्या ‘एचआयए’च्या सदस्य आहेत. सदस्य असलेल्या कंपन्यांनी प्रोजेक्ट(migrated0 हलवल्यास त्यांची नोंद ‘एचआयए’कडे होते. मात्र, ज्या कंपन्या सदस्य नाहीत, त्यांच्या स्थितीबाबत नोंद नाही.

या आहेत समस्या…

– गंभीर वाहतूक समस्या,
– महामार्गावरील अरुंद भुयारी मार्ग
– मेट्रोच्या कामामुळे अरुंद झालेले रस्ते
– रखडलेली पर्यायी रस्त्यांची कामे
– अतिक्रमणांचा विळखा
– पाणी, घनकचरा, वीज हे प्रश्न


‘‘हिंजवडीतून काही कंपन्यांचे प्रोजेक्ट गेले असले तरी काही नव्या कंपन्यांची वाढही झाली आहे. आता आमच्या सर्व अपेक्षा मेट्रोवर आहेत. मेट्रो सुरु झाल्यास येथील गंभीर वाहतूक समस्या कायमची सुटेल अशी अपेक्षा आहे.
– कर्नल चरणजित भोगल, मुख्य कार्यकारी अधिकारी, ‘एचआयए’

‘‘येथील मोठ्या आयटी कंपन्यांचे बंगळूर, चेन्नई, कोलकत्ता, हैदराबाद या ठिकाणी कॅम्पस आहेत. काही ब्रिटिश बेस कंपन्यांचे अधिकारी हिंजवडीत आले असता, त्यांना येथील समस्या जाणवल्या. त्यामुळे कामात सुटसुटीतपणा आणण्यासाठी ते आपला प्रोजेक्ट हलवतात. येथे काम करणाऱ्या सुमारे सहा लाख लोकांना ये-जा करण्यासाठी केवळ एकच रस्ता आहे. त्याचीही दुरवस्था झालेली आहे. पाच किलोमीटर प्रवासासाठी एक-एक तास लागतो. येथे पायभूत सुविधा देण्यासाठी सर्वांनी ताकदीने काम करणे गरजेचे आहे.
– लेफ्टनंट कर्नल निवृत्त योगेश जोशी, सचिव, हिंजवडी इंडस्ट्रिअल असोसिएशन

हेही वाचा :

भयंकर १५ वर्षीय मुलीने वडिलांसह लहान भावाला संपवलं; मृतदेहाचे तुकडे केले अन् फ्रीजमध्ये ठेवले

पेट्रोल डिझेलचे नवे दर जाहीर

राहुल गांधींचं ट्विट, सांगितला लोकसभेचा निकाल; मोदींनाही काढला चिमटा