आधुनिकतेच्या युगात महिलांच्या हक्कांबाबत जागरूकता वाढत असतानाही (harassment) कौटुंबिक छळाच्या घटना थांबताना दिसत नाहीत. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील खुळेवाडी गावात घडलेली अशीच एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. सासरच्या छळाला कंटाळून एका विवाहित महिलेनं आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून आत्महत्येपूर्वी तिनं हातावर संदेश लिहून आपली व्यथा व्यक्त केल्याचं सांगितलं जात आहे.

या प्रकरणानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी (harassment) दिलेल्या माहितीनुसार, संबंधित विवाहितेवर मानसिक तसेच शारीरिक छळ होत असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या संदेशाच्या आधारे सासू, सासरे आणि पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांनाही अटक करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांनी या संदर्भातील कारवाईची माहिती दिली.
मृत विवाहितेने पार्लरचा कोर्स सुरू केला होता. मात्र हा कोर्स करू नये यासाठी (harassment) तिच्यावर दबाव टाकला जात होता, तसेच विवाहाला पाच वर्षे होऊनही मूलबाळ नसल्याच्या कारणावरून तिला सतत मानसिक आणि शारीरिक त्रास दिला जात असल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. या छळाला कंटाळून तिने टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप तिच्या आई-वडिलांनी केला आहे.
मयत विवाहितेचे वडील अंकुश लोंढे (harassment) आणि आई कविता लोंढे यांनी या प्रकरणाचा खटला फास्टट्रॅक न्यायालयात चालवावा, विशेष सरकारी वकिलाची नेमणूक करावी आणि आरोपींना कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी केली आहे. आरोपींना फाशीची शिक्षा देऊन आपल्या मुलीला न्याय मिळावा, अशी भावनिक मागणीही त्यांनी केली आहे.या घटनेनंतर खुळेवाडी गावासह परिसरात संतापाची लाट उसळली आहे. गावकरी आणि नातेवाईकांनी आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. सध्या पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून न्यायालयीन प्रक्रियेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या प्रकरणात न्यायालय काय निर्णय देते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा :
आठव्या वेतन आयोगात पगारवाढ कधीपासून? एरियर किती मिळणार? वाचा नवीन अपडेट
शेतकरी मित्रांनो सावधान! ‘या’ अटी पूर्ण नसतील तर २२ वा हप्ता अडकणार