Employees’ Provident Fund Organisation (EPFO) च्या खातेधारकांसाठी दिलासा देणारी (big news) मोठी बातमी समोर आली आहे. Ministry of Labour and Employment ने पीएफ खात्यांबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला असून निष्क्रीय किंवा इनऑपरेटीव्ह खात्यांमधील लहान रक्कम थेट बँक खात्यात जमा करण्याची नवी योजना सुरू केली आहे.

या निर्णयानुसार ज्या पीएफ खात्यांमध्ये एक हजार रुपये किंवा त्याहून कमी शिल्लक रक्कम आहे (big news) आणि अनेक वर्षांपासून कोणतीही व्यवहार नोंद झालेली नाही, अशा खात्यांमधील रक्कम कोणतीही कागदपत्रे सादर न करता थेट संबंधित खातेदाराच्या बँक खात्यात वर्ग केली जाणार आहे. ज्यांचे खाते आधारशी संलग्न आहे, त्यांना ही रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होईल. उर्वरित खात्यांमध्येही टप्प्याटप्प्याने ही प्रक्रिया राबवली जाणार आहे.
जर एखाद्या ईपीएफओ खात्यात सलग तीन वर्षे कोणतीही (big news) आर्थिक हालचाल झाली नाही, तर ते खाते निष्क्रीय म्हणून घोषित केले जाते. सध्या ही योजना पायलट प्रोजेक्ट स्वरूपात सुरू करण्यात आली असून सुरुवातीला सुमारे ३१ लाख निष्क्रीय खात्यांपैकी जवळपास सहा लाख खात्यांची निवड करण्यात येणार आहे. हा प्रकल्प यशस्वी ठरल्यास उर्वरित सुमारे २५ लाख खात्यांनाही या स्वयंचलित प्रक्रियेचा लाभ दिला जाईल.
उपलब्ध आकडेवारीनुसार देशात सध्या ३१.८६ लाख निष्क्रीय (big news) ईपीएफओ खाती आहेत, ज्यामध्ये एकूण १०,९०३ कोटी रुपयांची रक्कम अडकलेली आहे. त्यापैकी सुमारे सहा लाख खात्यांमध्ये एक हजार रुपयांपर्यंतची किरकोळ रक्कम असून त्यात मिळून सुमारे ३०.५२ कोटी रुपये पडून आहेत. विशेष म्हणजे, काही खाती गेल्या २० वर्षांपासून निष्क्रीय आहेत आणि त्यातील रक्कम अद्यापही न वापरता तशीच पडून आहे.
नोकरी बदलल्यानंतर अनेक कर्मचारी जुन्या पीएफ खात्यांकडे दुर्लक्ष (big news) करतात किंवा कमी रकमेकरिता गुंतागुंतीची कागदी प्रक्रिया टाळतात. मात्र आता नव्या व्यवस्थेमुळे कोणतीही धावपळ किंवा अर्ज प्रक्रिया न करता ही रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पोहोचणार आहे. श्रम मंत्रालयाच्या या निर्णयामुळे ईपीएफओशी संलग्न लाखो खातेदारांना थेट दिलासा मिळणार आहे.
हेही वाचा :
आठव्या वेतन आयोगात पगारवाढ कधीपासून? एरियर किती मिळणार? वाचा नवीन अपडेट
शेतकरी मित्रांनो सावधान! ‘या’ अटी पूर्ण नसतील तर २२ वा हप्ता अडकणार