आधुनिक जीवनशैलीमुळे आपले खाणे-पिणे पूर्णपणे घड्याळाच्या काट्यांवर अवलंबून झाले (modern lifestyle) आहे. मात्र आयुर्वेद वेगळी दिशा दाखवतो. National Institute of Ayurvedaच्या तज्ज्ञांच्या मते मानवी शरीर हे यंत्र नसून निसर्गाचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे ते सूर्याच्या लयीनुसार कार्य करते. औषधे किंवा कठोर आहार पद्धतींपेक्षा सूर्याच्या तालाचा आदर करणे अधिक महत्त्वाचे मानले जाते. आयुर्वेदानुसार जेवणाची वेळ ही घड्याळावर नव्हे तर सूर्योदय आणि सूर्यास्तावर आधारित असावी. सूर्य तळपत असताना पचनशक्ती सर्वोच्च असते, तर सूर्य मावळल्यानंतर ती मंदावते.

तज्ज्ञ सांगतात की, दिवसातील आहाराचे स्वरूप तीन (modern lifestyle) टप्प्यांत विभागलेले असावे. सकाळी सूर्योदयानंतर शरीरातील पाचक अग्नी हळूहळू प्रज्वलित होतो, त्यामुळे नाश्ता हलका आणि सहज पचणारा असावा. हळदीचे दूध, पोहे, उपमा, इडली, फळे किंवा लापशीसारखे पदार्थ शरीराला ऊर्जा देतात आणि पचनसंस्थेवर ताण आणत नाहीत. दुपारच्या वेळी सूर्य शिखरावर असतो आणि पचनशक्ती सर्वाधिक सक्रिय असते. त्यामुळे दुपारचे जेवण पौष्टिक व भरपूर असावे. डाळ-भात, पोळी-भाजी, सांबार-भात किंवा तूप-खिचडीसारखे पदार्थ या वेळी सहज पचतात. संध्याकाळी मात्र शरीराचा वेग मंदावतो. त्यामुळे रात्रीचे जेवण हलके, कमी मसालेदार आणि झोपण्याच्या दोन ते तीन तास आधी घेतलेले असावे. सूप, मूगडाळ खिचडी, मऊ भाज्या किंवा हलकी रोटी-भाजी हे पर्याय योग्य ठरतात.
आयुर्वेदात “भूक लागेल तेव्हा खा” हा सल्ला पूर्णपणे योग्य नाही, असे मानले (modern lifestyle) जाते. भुकेची तीव्रता ही सूर्याच्या चक्राशी निगडित असते. सकाळी सौम्य भूक, दुपारी तीव्र भूक आणि संध्याकाळी कमी भूक असणे ही नैसर्गिक लय आहे. संध्याकाळी जास्त भूक लागत असेल तर दिवसभरातील खाण्याच्या वेळा विस्कळीत झाल्याचे ते लक्षण मानले जाते.
याच संकल्पनेशी (modern lifestyle) सुसंगत असलेली “सर्केडियन रिदम डाएट” ही पद्धत आज पुन्हा चर्चेत आली आहे. शरीरातील २४ तासांच्या जैविक घड्याळानुसार आहार घेतल्यास झोप, पचन, हार्मोन्स आणि ऊर्जा पातळी संतुलित राहते, असे तज्ज्ञ सांगतात. सकाळी उठल्यानंतर एका तासात पौष्टिक नाश्ता, दुपारी सर्वात जड जेवण आणि संध्याकाळी हलका आहार ही या पद्धतीची मूलभूत तत्त्वे आहेत. उशिरा रात्री खाणे टाळणे, सकाळी सूर्यप्रकाशात वेळ घालवणे आणि झोपण्यापूर्वी स्क्रीनचा वापर कमी करणे यामुळे जैविक घड्याळ संतुलित राहते.
पुरेशी झोप, नियमित व्यायाम आणि संतुलित आहार यामुळे वजन नियंत्रणात राहते, पचन सुधारते आणि शरीराची नैसर्गिक लय टिकून राहते. आयुर्वेदाचा साधा संदेश स्पष्ट आहे—सूर्याच्या लयीत जगले तर आरोग्य आपोआप साथ देते.
हेही वाचा :
आठव्या वेतन आयोगात पगारवाढ कधीपासून? एरियर किती मिळणार? वाचा नवीन अपडेट
शेतकरी मित्रांनो सावधान! ‘या’ अटी पूर्ण नसतील तर २२ वा हप्ता अडकणार