जगभरातील कोट्यवधी लोक रोज व्हॉट्सअॅपचा वापर करतात.(schedule)व्हॉट्सअॅपमुळे अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहे. काही क्लिकवर तुम्ही मेसेज पाठवू शकतात. व्हॉट्सअॅपमुळे अनेक कामे झटपट होतात. व्हॉट्सअॅप नेहमीच त्यांच्या युजर्ससाठी वेगवेगळे फीचर्स लाँच करत असतात. व्हॉट्सअॅप लवकरच एक नवीन फीचर लाँच करण्याच्या तयारीत आहे. या नवीन फीचरमध्ये तुम्हाला आता मेसेज शेड्युल करता येणार आहे.

अनेकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी रात्री १२ वाजेपर्यंत जागे राहावे लागते. (schedule)अनेकदा आपण खूप गोष्टी विसरतो त्यामुळे आता तुम्हाला रिमायंडर मिळणार आहे. तुमचे मेसेज तुम्ही शेड्युल करु शकतात. ज्या वेळी तुम्हाला तो मेसेज समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहचवायचा आहे तेव्हा तो त्या व्यक्तीपर्यंत पोहचेल. त्यामुळे युजर्सला खूप फायदा होणार आहे.WABetaInfo ने दिलेल्या माहितीनुसार, सध्या या फिचरवर काम सुरु आहे. सर्वात आधी आयफोन युजर्ससाठी हे फीचर सुरु होईल. यानंतर फीचर हळूहळू सर्वांसाठी सुरु होईल.
व्हॉट्सअॅपवर तुम्हाला एका वेळेसाठी मेसेज शेड्युल केला तर तो त्याचवेळी (schedule)समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहचणार आहे. तुम्ही जेव्हा त्या व्यक्तीचे चॅट ओपन कराल तिथे तुम्हाला हा मेसेज दिसेल. त्यासाठी एक वेगळे सेक्शन असेल. त्यामुळे तुम्हाला किती मेसेज शेड्युल आहे हे समजले. तुम्ही या मेसेजला मॅनेज करु शकतात.जर तुम्ही मेसेज शेड्युल केला तर तो डिलिव्हर होईपर्यंत तुम्ही त्यामध्ये एडिटिंग करु शकतात.याचसोबत तुम्हाला डिलिटदेखील करता येईल. याबाबत समोरच्या व्यक्तीला कोणतेही नोटिफिकेशन जाणार नाही.
हेही वाचा :
नोकरी बदलल्याने निष्क्रीय झालेल्या PF खात्यातील पैशांसंदर्भात सरकारचा मोठा निर्णय
हा देश म्हणजे हिऱ्याची खाण, भारताशी आहे खास नातं
जेवणाची योग्य वेळ काय? आरोग्याला कसा फायदा होणार जाणून घ्या