त्तर प्रदेशातील वृंदावनमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी एक (Young) अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. एका ३५ वर्षीय व्यक्तीने एका कुत्रीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या क्रूर कृत्यामुळे त्या निष्पाप कुत्रीचा मृत्यू झाला असून, या घटनेनंतर संपूर्ण परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना उत्तर प्रदेशातील वृंदावन येथील गोविंद कुंडजवळील कुशवाह गल्लीत घडली आहे. एका ३५ वर्षीय मजुराच्या बायकोचं दीड वर्षांपूर्वी निधन झालं. तिच्या जाण्याने तरुण खचला. तो नैराश्येत गेला.

या नैराश्येतून या तरुणाने गल्लीतील एका पाळलेल्या कुत्रीवर बलात्कार केला. (Young) या अमानुष अत्याचारानंतर कुत्री गंभीर जखमी झाली आणि तिचा मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच, लोकांमध्ये संतापाची लाट उसळली. शेजाऱ्यांनी आरोपीला पकडले. जमावाने त्याच्या तोंडावर काळ फासलं आणि त्याच्या गळ्यात चप्पलांचा हार घालून त्याची गावभर धिंड काढली. इतकंच नाही तर या नराधमाला स्थानिक नागरिकांनी चोप देत चांगलीच अद्दल घडवली.

स्थानिकांनी सांगितले की, वृंदावन सारख्या पवित्र शहरात अशा (Young) घटना घडणं लज्जास्पद आहे. या नराधमाला कठोरातील कठोर शिक्षा व्हावी अशी नागरिकांनी मागणी केली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. पोलीस या घटनेचा सविस्तर तपास करत असून आरोपीला ताब्यात घेतले आहे.

हेही वाचा :

नोकरी बदलल्याने निष्क्रीय झालेल्या PF खात्यातील पैशांसंदर्भात सरकारचा मोठा निर्णय

हा देश म्हणजे हिऱ्याची खाण, भारताशी आहे खास नातं

जेवणाची योग्य वेळ काय? आरोग्याला कसा फायदा होणार जाणून घ्या

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *