अजितदादांच्या निधनानंतर, सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा (name) राजीनामा दिला आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्या रिक्त जागी पार्थ पवार यांचं नाव सुनिश्चित मानल्या जात होतं. आता हाती आलेल्या माहितीनुसार पार्थ पवार हे खासदार होतील. तर भाजप आणि शिंदे शिवसेनेकडूनही उमेदवारांच्या नावाची चाचपणी सुरू होती. ही नावही निश्चित झाल्याची माहिती समोर येत आहे. यातील काहींना पुन्हा खासदारकी मिळणार असल्याचे समोर येत आहे. राज्यसभेसाठी अनेकांनी फिल्डिंग लावली आहे. पण सध्या ही नावं सर्वात आघाडीवर असल्याचे समजते. दुसरीकडे महाविकास आघाडीकडून शरद पवार यांचे नाव पुढे येत आहे. लवकरच याविषयीची माहिती समोर येईल.

सुनेत्रा पवार यांच्या राज्यसभेतील रिक्त जागी पार्थ पवार यांचे नाव निश्चित (name) झाल्याचे समजते. सोमवारी रात्री झालेल्या पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत निर्णय झाल्याची माहिती समोर येत आहे. सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत पार्थ पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्यासह प्रफुल पटेल यांच्या निवासस्थानी पार पडलेल्या बैठकीला कोअर कमिटीचे सदस्य उपस्थित होते. तसचं २६ फेब्रुवारीला होणाऱ्या राष्ट्रीय अध्यक्ष निवडी संदर्भात आयोजित केल्या जाणाऱ्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक तयारी विषयी या बैठकीत चर्चा झाली. वरळी डोम येथे राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक २६ तारखेला होणार आहे, जिथे सुनेत्रा पवार यांच्या नावावर राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून शिक्कामोर्तब केले जाणार आहे.

राज्यसभेसाठी भाजपच्या वाट्याला चार जागा येणार आहेत.भाजपमध्ये राज्यसभेसाठी आयात केलेल्या उमेदवारांना संधी देऊ नका अशी ओरड होत होती. त्यासाठी निष्ठावंतांनी त्यांच्या भावना पक्ष श्रेष्ठींना कळवल्याची माहिती सूत्रांनी दिली. गेल्या काही वर्षात पक्षात इतर पक्षातून आलेल्यांची संख्या मोठी वाढली आहे. त्यात अनेक बडी नावं सुद्धा आहेत. बाहेरून आलेल्यांना लागलीच मोठी पदं देण्यात आल्याने निष्ठावंत नाराज आहेत. त्यामुळे भाजपमध्ये राज्यसभेची खासदारकी कुणाला मिळणार याची चर्चा रंगली आहे.

भाजपकडून रामदास आठवले यांच्या नावावर शिक्कामोतर्ब झाले आहे. (name)तर उर्वरीत तीन जागांसाठी कुणाचं नाव समोर येतं याविषयी चर्चा रंगली आहे. एक जागा रिपाई गटासाठी सोडण्यात आल्याचे दिसून येत आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून राहुल शेवाळे यांचं नाव राज्यसभेसाठी निश्चित मानल्या जात आहे. तसेच शिंदे गटाकडून शायना एनसी आणि संजय निरुपम यांच्या नावाची चर्चा सुद्धा आहे. आता अखेरच्या टप्प्यात कुणाला राज्यसभेची लॉटरी लागणार याविषयीची चर्चा रंगली आहे.

राज्यसभेसाठी निवडणूक कार्यक्रम
राज्यसभेच्या 37 जागांसाठी 26 फेब्रुवारी रोजी नोटिफिकेशन
5 मार्चपर्यंत उमेदवारांना अर्ज स्वीकार
6 मार्च रोजी अर्ज छाननी
9 मार्च रोजीपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत
16 मार्च रोजी सकाळी 9 वाजेपासून ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत मतदान
16 मार्च रोजी संध्याकाळी 5 वाजेपासून मत मोजणीला सुरुवात
20 मार्चपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण

हेही वाचा :

नोकरी बदलल्याने निष्क्रीय झालेल्या PF खात्यातील पैशांसंदर्भात सरकारचा मोठा निर्णय

हा देश म्हणजे हिऱ्याची खाण, भारताशी आहे खास नातं

जेवणाची योग्य वेळ काय? आरोग्याला कसा फायदा होणार जाणून घ्या

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *