उत्तराखंडमधील रुद्रपूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे.(Gang) एका विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे या संतापजनक कृत्याच्यामागे दुसरा तिसरा कोणी नसून तिचा दीर असल्याचं समोर आलं आहे. पैशांसाठी त्याने स्वतःच्या भावाच्या बायकोचा सौदा केला. दरम्यान पोलीस पकडतील या भीतीने त्याने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु केला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी संध्याकाळी उशिरा जीआरपी नजीबाबाद-नगीना रेल्वे स्थानकादरम्यान लिंक एक्सप्रेस ट्रेनमध्ये नियमित तपासणी करत असताना, पोलिसांना आरोपी अभय सक्सेना हा ट्रेनमध्ये विष प्यायलेल्या अवस्थेत बेशुद्ध स्थितीत आढळला. संशय आल्याने जीआरपीने त्याला तात्काळ नागीना रेल्वे स्थानकावर उतरवले आणि रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे.

अधिक चौकशी केल्यांनतर तपासात असे आढळले की आरोपी (Gang)याने पैशांसाठी मित्रांची मदत घेऊन स्वतःच्या सख्ख्या भावाच्या बायकोचा सौदा केला. अभयला पैशांची गरज होती. त्याने त्याच्या भावाच्या बायकोला मित्रांच्या हाती सोपवलं. २२ फेब्रुवारी रोजी पीडित महिलेने पतीजवळ जत्रेला जायचा तगादा लावला होता. मात्र पतीने आणि इतर कुटुंबीयांनी तीला नकार दिला. याचाच फायदा अभयने उचलला. अभयने पीडित महिलेसोबत जाण्याची तयारी दाखवली.

जत्रेत आरोपीचे मित्र आधीच डब्बा धरून बसले होते.(Gang) पीडित महिलेचा सतत पाठलाग करत होते. एका ठिकाणी महिला थांबल्यावर तिला बंदुकीचा धाक दाखवत तिच्यावर जबरदस्ती करण्यात आली. त्यानंतर आरोपीच्या मित्राने महिलेवर सामूहिक बलात्कार केला. याबदल्यात अभयला पैसे मिळाले. त्यानंतर अभयने घटनास्थळावरुन पळ काढला. मात्र पोलिसांच्या कचाट्यात अडकण्याच्या भीतीने त्याने टोकाचं पाऊल उचलत आत्महत्येचा प्रयत्न केला. परंतु अखेर एका रेल्वे स्थानकादरम्यान तपासणी सुरु असताना अभय पोलिसांच्या तावडीत सापडला. याप्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आली असून परिसरात खळबळ उडाली आहे.

हेही वाचा :

सचिवांच्या आदेशानंतरही बहुजन कल्याण विभागाचा ‘अजब’ कारभार; रद्द शाळांच्या पुनर्मूल्यांकनाचे आदेश

पहिलं Long Distance Relationship आता Silent Love! काय आहे हा नवा ट्रेंड ?

‘धुरंधर 2’मध्ये ‘बडे साहब’ कोण? अखेर पडदा उघडला; या अभिनेत्याचे नाव समोर येताच…

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *