उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यातील शादीपुर परिसरात एक धक्कादायक आणि (controversial case) चर्चेचा विषय ठरलेले प्रकरण समोर आले आहे. एका तरुणीने आपल्या सख्ख्या मावशीच्या पतीसोबत राहण्याचा हट्ट धरल्याने परिसरात तासन्तास गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. या घटनेमुळे कुटुंबीयांमध्ये तणाव निर्माण झाला असून रस्त्यावर मोठी गर्दी जमल्याने हा प्रकार चर्चेचा विषय ठरला आहे.

माहितीनुसार, संबंधित तरुणी काही दिवसांपूर्वी (controversial case) आपल्या मावशीच्या घरी राहण्यासाठी आली होती. कुटुंबीयांनी तिला परत घरी नेण्याचा प्रयत्न केला असता तिने मावशीच्या पतीसोबतच राहण्याचा ठाम निर्णय जाहीर केला. रस्त्यावरच ती मोठ्याने ओरडत होती की तिला “काकां”सोबतच राहायचे आहे आणि ती त्यांची पत्नी बनून राहील. या प्रकारामुळे परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने जमले आणि अनेक तास हा गोंधळ सुरू होता.
दरम्यान, संबंधित व्यक्ती आधीच (controversial case) विवाहित असल्याची माहिती समोर आली आहे. तरुणी मात्र आपल्या भूमिकेवर ठाम राहिली. कुटुंबीयांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत तिला जबरदस्तीने ऑटोमध्ये बसवून घरी नेले. या घटनेनंतर परिसरात विविध चर्चा सुरू झाल्या आहेत.संबंधित कुटुंबीयांनी हे प्रकरण कौटुंबिक असल्याचे सांगत पोलिसांत कोणतीही अधिकृत तक्रार दिलेली नाही. मात्र या घटनेमुळे नातेसंबंधातील गुंतागुंत आणि सामाजिक प्रश्न पुन्हा एकदा समोर आले असून स्थानिक पातळीवर याबाबत वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
हेही वाचा :
सचिवांच्या आदेशानंतरही बहुजन कल्याण विभागाचा ‘अजब’ कारभार; रद्द शाळांच्या पुनर्मूल्यांकनाचे आदेश
पहिलं Long Distance Relationship आता Silent Love! काय आहे हा नवा ट्रेंड ?
‘धुरंधर 2’मध्ये ‘बडे साहब’ कोण? अखेर पडदा उघडला; या अभिनेत्याचे नाव समोर येताच…