भारतातील मान्सून पॅटर्नमध्ये मोठे बदल होत असल्याचे नव्या (monsoon pattern) संशोधनातून स्पष्ट झाले आहे. देशात एकूण मान्सून पावसाचे प्रमाण वाढत असले तरी हंगामाच्या शेवटी होणारा सर्वाधिक पाऊस हळूहळू पश्चिमेकडे सरकत असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. विशेष म्हणजे या बदलांचे मूळ तब्बल 6,800 किलोमीटर दूर असलेल्या Arctic Oceanमध्ये सापडल्याने शास्त्रज्ञांमध्ये चिंता वाढली आहे.

The Earth.com मधील वृत्तानुसार, Indian Institute of Tropical Meteorology (IITM) च्या संशोधकांनी 1979 ते 2022 या कालावधीतील हवामानविषयक निरीक्षणांचा सखोल अभ्यास केला. या संशोधनात आर्क्टिक समुद्रातील बर्फाचे प्रमाण आणि भारतीय उन्हाळी मान्सून पाऊस (ISMR) यांचा परस्पर संबंध आढळून आला. ज्या वर्षांत आर्क्टिक समुद्रातील बर्फाचे प्रमाण कमी होते, त्या वर्षांत भारतात सरासरीपेक्षा अधिक मान्सून पाऊस पडण्याची प्रवृत्ती दिसून आली.

आयआयटीएमचे शास्त्रज्ञ आणि प्रमुख लेखक (monsoon pattern) सुबोध कुमार साहा यांनी सांगितले की जून-जुलै दरम्यान आर्क्टिकमधील बर्फात होणारे बदल ऑगस्ट-सप्टेंबरमधील मान्सूनच्या शेवटच्या टप्प्यावर ठोस परिणाम करतात. म्हणजेच उन्हाळ्याच्या सुरुवातीला आर्क्टिकमधील बर्फाची स्थिती हंगामाच्या उत्तरार्धात पावसाचे स्वरूप कसे असेल, हे ठरवू शकते. संशोधन पथकाने विविध हवामान मॉडेल्सचा वापर करून निरीक्षणांमध्ये दिसलेले नमुने पडताळून पाहिले आणि त्यातूनही समान निष्कर्ष समोर आले.

संशोधक हेमंतकुमार एस. चौधरी यांच्या (monsoon pattern) मते, जागतिक तापमानवाढ आणि तिचे असमान वितरण यामुळे आर्क्टिक प्रदेश वेगाने तापत आहे. समुद्रातील बर्फ वितळल्याने वातावरणातील उष्णतेचा प्रवाह बदलतो आणि त्याचे परिणाम दूरवरच्या प्रदेशांवरही होऊ शकतात. हे वातावरणीय बदल खंडांवर परिणाम करत भारतातील मान्सून प्रणालीवर प्रभाव टाकत आहेत.

भारतातील उन्हाळी मान्सून ही देशाची जीवनरेखा मानली जाते. जून ते सप्टेंबर या (monsoon pattern) कालावधीत देशाच्या वार्षिक पावसाच्या सुमारे 80 टक्के पाऊस याच हंगामात पडतो. ऑगस्ट-सप्टेंबरमधील उशिरा होणारा पाऊस शेतीसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. पश्चिमेकडील भागात पावसाचे प्रमाण वाढले आणि इतर भागांत घट झाली, तर पाण्याचे संतुलन बिघडू शकते, पूरस्थिती किंवा दुष्काळाचा धोका निर्माण होऊ शकतो.हा महत्त्वपूर्ण अभ्यास ‘Ocean-Land-Atmosphere Research’ या आंतरराष्ट्रीय संशोधन जर्नलमध्ये प्रकाशित झाला असून, भविष्यातील मान्सून अंदाज आणि हवामान बदल समजून घेण्यासाठी तो अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

हेही वाचा :

सचिवांच्या आदेशानंतरही बहुजन कल्याण विभागाचा ‘अजब’ कारभार; रद्द शाळांच्या पुनर्मूल्यांकनाचे आदेश

पहिलं Long Distance Relationship आता Silent Love! काय आहे हा नवा ट्रेंड ?

‘धुरंधर 2’मध्ये ‘बडे साहब’ कोण? अखेर पडदा उघडला; या अभिनेत्याचे नाव समोर येताच…

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *