अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यात भीषण अपघाताची घटना (terrible accident) घडली असून सहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. श्रीरामपूर–संगमनेर मार्गावर स्विफ्ट कार आणि मालवाहू ट्रक यांची जोरदार धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की कारचा चक्काचूर झाला आणि वाहनांचे मोठे नुकसान झाले.

मिळालेल्या (terrible accident) माहितीनुसार, सर्व जण श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा गाव येथे देवदर्शनासाठी निघाले होते. मात्र खंडाळ्याकडे जात असताना वाटेतच ट्रक आणि कारची समोरासमोर धडक झाली आणि क्षणात आनंदाच्या प्रवासाचे दुःखद घटनांमध्ये रूपांतर झाले. अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला असून एका सहा वर्षांच्या मुलाला गंभीर दुखापत झाली आहे. जखमी मुलावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी (terrible accident) घटनास्थळी धाव घेतली. बचावकार्य राबवून जखमी मुलाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांकडून अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू असून पुढील तपास सुरू आहे.
हेही वाचा :
सचिवांच्या आदेशानंतरही बहुजन कल्याण विभागाचा ‘अजब’ कारभार; रद्द शाळांच्या पुनर्मूल्यांकनाचे आदेश
पहिलं Long Distance Relationship आता Silent Love! काय आहे हा नवा ट्रेंड ?
‘धुरंधर 2’मध्ये ‘बडे साहब’ कोण? अखेर पडदा उघडला; या अभिनेत्याचे नाव समोर येताच…