देशातच नव्हे तर जगभरात पंतप्रधान Narendra Modi यांची लोकप्रियता (political) सातत्याने वाढताना दिसते. सोशल मीडियाच्या युगात नेत्यांची ओळख आणि प्रभाव त्यांच्या डिजिटल उपस्थितीवरूनही मोजला जातो. अशातच इंस्टाग्रामवर 100 मिलियन फॉलोअर्सचा टप्पा पार करत मोदी यांनी जागतिक पातळीवर ऐतिहासिक कामगिरी नोंदवली आहे. हा आकडा गाठणारे ते जगातील पहिले प्रमुख राजकीय नेते ठरले आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताच्या नेतृत्वाची डिजिटल ताकद पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. इतर देशांतील बड्या नेत्यांच्या तुलनेत त्यांची आघाडी किती मोठी आहे, हे आकडेवारीतून स्पष्ट दिसते.

Narendra Modi – 100 मिलियन फॉलोअर्स
Donald Trump – 43.2 मिलियन फॉलोअर्स
Prabowo Subianto – 15 मिलियन फॉलोअर्स
Luiz Inácio Lula da Silva – 14.4 मिलियन फॉलोअर्स
Recep Tayyip Erdoğan – 11.6 मिलियन फॉलोअर्स
Javier Milei – 6.4 मिलियन फॉलोअर्स

पंतप्रधान मोदींनंतर, डोनाल्ड ट्रम्प 43.2 दशलक्ष फॉलोअर्ससह दुसऱ्या (political) क्रमांकावर आहेत. इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो सुबियांतो 15 दशलक्ष फॉलोअर्ससह तिसऱ्या क्रमांकावर आहेत. ब्राझीलचे अध्यक्ष 14.4 दशलक्ष फॉलोअर्ससह चौथ्या क्रमांकावर आहेत आणि तुर्कीचे अध्यक्ष तय्यिप एर्दोगान 11.6 दशलक्ष फॉलोअर्ससह पाचव्या क्रमांकावर आहेत. शेवटी, अर्जेंटिनाचे अध्यक्ष जेवियर मेली यांचे 6.4 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. या यादीतून स्पष्ट होते की इतर मोठ्या नेत्यांच्या तुलनेत मोदी यांची आघाडी दुप्पटपेक्षा जास्त आहे.भारतातही मोदी यांची डिजिटल लोकप्रियता सर्वाधिक आहे. त्यांच्या तुलनेत इतर नेते खूप मागे असल्याचे दिसते. मात्र खूप कमी काळता योगी आदित्यनाथ यांनीही तुलनेने खूप जास्त लोकप्रियता मिळवली आहे.

Narendra Modi – 100 मिलियन फॉलोअर्स
Yogi Adityanath – 16.1 मिलियन फॉलोअर्स
Rahul Gandhi – 12.6 मिलियन फॉलोअर्स

जर आपण फक्त भारताचा विचार केला तर, उत्तर प्रदेशचे (political) मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे पंतप्रधान मोदींनंतर इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स असलेल्या दुसऱ्या क्रमांकावर आहेत. 16.1 दशलक्ष फॉलोअर्ससह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे पंतप्रधान मोदींपेक्षा खूप मागे आहेत. काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे अंदाजे 12.6 दशलक्ष फॉलोअर्ससह तिसऱ्या क्रमांकावर आहेत.या आकडेवारीवरून देशांतर्गत आणि जागतिक पातळीवर मोदी यांचा डिजिटल प्रभाव किती व्यापक आहे, हे अधोरेखित होते. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी तरुणांशी आणि विविध देशांतील लोकांशी थेट संवाद साधत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

हेही वाचा :

मोठी बातमी! भाविकांवर काळाचा घाला, श्रीरामपूर -संगमनेर रस्त्यावर भीषण अपघात, कार, ट्रकच्या धडकेत 6 जणांचा मृत्यू

शाहिद कपूरच्या करियरमधील असा चित्रपट, जिथे हिरॉईनपेक्षाही मिळाले होते कमी पैसे!

भारतात मान्सूनचे वेळापत्रक आणि दिशा का बदलत आहे? 6,800 KM अंतरावर सापडले कारण; शास्त्रज्ञांची झोप उडाली

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *