नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने लाखो हवाई प्रवास (money) करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा दिला आहे. जर तुम्ही तिकीट बुकिंग केल्याच्या ४८ तासांच्या आत फ्लाइट रद्द केली तर तुम्हाला कोणतेही अतिरिक्त शुल्क भरावे लागणार नाहीये. प्रवाशांच्या तक्रारी आणि तिकीट परतफेडीत होणाऱ्या विलंबाच्या पार्श्वभूमीवर DGCA ने हे पाऊल उचलण्यात आले आहे. प्रवाशांच्या हितासाठी बनवण्यात आलेल्या नवीन नियमांअंतर्गत नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने ही सुविधा दिली जात आहे.

डीजीसीएच्या नवीन सुधारित नियमांनुसार, जर तिकीट थेट विमान (money) कंपनीच्या वेबसाइटवरून बुक केले असेल, तर प्रवासीने आपल्या तिकीट बुकिंगच्या ४८ तासांत तिकीट रद्द केले तर त्यावर कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. जर बुक केलेल्या तिकीटात प्रवासीचं नाव चुकले असेल आणि तो ती चूक २४ तासाच्या आत दुरुस्त केली तर त्यासाठी त्यांना कोणतेच शुल्क भरावे लागणार नाहीये. दरम्यान ही सुविधा केवळ ऑनलाइन बुकिंग करणाऱ्या प्रवाशांसाठी लागू असणार आहे.

जर तुम्ही तिकीट ट्रॅव्हल एजंट किंवा ऑनलाइन पोर्टलद्वारे खरेदी केले असेल, (money) तर परतफेड करण्याची जबाबदारी एअरलाइनची असणार आहे. डीजीसीएने विमान कंपन्यांना कामकाजाच्या १४ दिवसांत सर्व परतफेड प्रक्रिया करण्याचे निर्देश दिलेत. यामुळे प्रवाशांना आता परफेडसाठी जास्त दिवस प्रतिक्षा करावी लागणार नाहीये. तसेच डीजीसीएची ही सुविधा पूर्णपणे पादर्शक असणार आहे.जर एखाद्या प्रवाशाने वैद्यकीय इमरजन्सीमुळे त्यांची फ्लाइट रद्द केली तर त्यांना परतफेड मिळविण्यात कोणतीही अडचण येणार नाही,असेही या नवीन नियमात सांगण्यात आले आहे. डिसेंबर २०२५ मध्ये एअरलाइन तिकिटांच्या परतफेडीबद्दल आणि इंडिगोच्या फ्लाइटमधील समस्यांबद्दलच्या तक्रारींनंतर डीजीसीएने हा बदल केला.

हेही वाचा :

मोठी बातमी! भाविकांवर काळाचा घाला, श्रीरामपूर -संगमनेर रस्त्यावर भीषण अपघात, कार, ट्रकच्या धडकेत 6 जणांचा मृत्यू

शाहिद कपूरच्या करियरमधील असा चित्रपट, जिथे हिरॉईनपेक्षाही मिळाले होते कमी पैसे!

भारतात मान्सूनचे वेळापत्रक आणि दिशा का बदलत आहे? 6,800 KM अंतरावर सापडले कारण; शास्त्रज्ञांची झोप उडाली

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *