पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील तणाव पुन्हा एकदा भीषण (major attack) स्वरूपात समोर आला आहे. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानने अफगाणिस्तानवर मोठा हल्ला केल्यानंतर परिस्थिती अधिकच चिघळली असून आता दोन्ही देशांमध्ये प्रत्यक्ष युद्धजन्य स्थिती निर्माण झाली आहे. पाकिस्तानच्या कारवाईनंतर अफगाणिस्तानकडून कठोर इशारा देण्यात आला होता आणि त्यानंतर मध्यरात्री तालिबानच्या नेतृत्वाखालील इस्लामिक अमिराती सैन्याने जोरदार प्रत्युत्तरात्मक हल्ला केल्याचा दावा केला आहे.

अफगाण लष्करी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार (major attack) सीमावर्ती भागातील अनेक पाकिस्तानी सैन्य चौक्यांवर ताबा मिळवण्यात आला असून कुनार प्रांतातील कारवाईत 55 पाकिस्तानी सैनिक ठार झाल्याचा दावा करण्यात आला आहे. पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवर मोठ्या प्रमाणात गोळीबार आणि हवाई हालचाली सुरू असून परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण बनली आहे.

या घडामोडींनंतर (major attack) पाकिस्ताननेही आक्रमक पवित्रा घेत थेट अफगाणिस्तानची राजधानी काबूलवर हवाई बॉम्बहल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत अफगाण तालिबानविरुद्ध विशेष ऑपरेशन सुरू केल्याची घोषणा केली आहे. पाकिस्तानचा दावा आहे की त्यांच्या रात्रीच्या हल्ल्यात 130 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. या दाव्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरही चिंता व्यक्त केली जात आहे.

काही महिन्यांपूर्वीही दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला होता. त्यावेळी (major attack) सौदी अरेबियाने मध्यस्थी करत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला होता. मात्र रमजान महिन्यातच पुन्हा सुरू झालेल्या या संघर्षामुळे परिस्थिती अधिक संवेदनशील झाली आहे. अफगाणिस्तानने पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यांना जोरदार प्रत्युत्तर देत सीमावर्ती भागातील 15 चौक्या ताब्यात घेतल्याचा दावा केला आहे.

दोन्ही बाजूंनी मोठे दावे आणि (major attack) प्रतिदावे केले जात असताना सीमावर्ती नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष या संघर्षाकडे लागले असून युद्धाची ठिणगी अधिक भडकू नये यासाठी कोणते देश पुढाकार घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान, या संपूर्ण घडामोडींवर भारतासह इतर शेजारी देशांचे बारकाईने लक्ष असल्याचे समजते.

हेही वाचा :

मोठी बातमी! भाविकांवर काळाचा घाला, श्रीरामपूर -संगमनेर रस्त्यावर भीषण अपघात, कार, ट्रकच्या धडकेत 6 जणांचा मृत्यू

शाहिद कपूरच्या करियरमधील असा चित्रपट, जिथे हिरॉईनपेक्षाही मिळाले होते कमी पैसे!

भारतात मान्सूनचे वेळापत्रक आणि दिशा का बदलत आहे? 6,800 KM अंतरावर सापडले कारण; शास्त्रज्ञांची झोप उडाली

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *