जर तुम्ही WhatsApp, Telegram किंवा Signal सारखी मेसेजिंग अॅप्स वापरत (WhatsApp) असाल, तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. केंद्र सरकारने सिम बाइंडिंग नियम लागू करण्यासाठी दिलेली 28 फेब्रुवारीची मुदत वाढविणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे 1 मार्च 2026 पासून नवीन नियम प्रभावी होणार आहेत.

या नव्या नियमानुसार, WhatsApp, Signal, Telegram, ShareChat, Snapchat, JioChat आणि Josh यांसारखी अॅप्स वापरण्यासाठी संबंधित मोबाईलमध्ये नोंदणीकृत सिम कार्ड असणे बंधनकारक राहणार आहे. जर त्या फोनमध्ये सिम कार्ड नसेल, तर ही अॅप्स कार्य करणार नाहीत. संगणकावर लॉग इन केलेले WhatsApp देखील सिम नसल्यास सहा तासांच्या आत आपोआप लॉग आउट होईल.
सिम बाइंडिंग म्हणजे अॅपला थेट तुमच्या भौतिक सिम (WhatsApp) कार्डशी जोडणे. यामुळे कोणत्याही इतर डिव्हाइसवरून तुमचा मोबाईल नंबर वापरून लॉग इन करणे कठीण होईल. सरकारच्या मते, या उपाययोजनेमुळे सायबर फसवणूक, बनावट कॉल्स आणि डिजिटल गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवणे सोपे होईल.
केंद्रीय दूरसंचार मंत्री Jyotiraditya Scindia यांनी स्पष्ट केले की नियमांच्या अंमलबजावणीबाबत (WhatsApp) कोणतीही सवलत दिली जाणार नाही. राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने हे पाऊल आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. दूरसंचार कायदा 2023 आणि संबंधित सायबर सुरक्षा नियमांनुसार कंपन्यांना 120 दिवसांच्या आत अंमलबजावणीचा अहवाल सादर करावा लागेल. नियमांचे उल्लंघन झाल्यास कठोर कारवाई केली जाईल.युजर्सनी आपला WhatsApp किंवा इतर मेसेजिंग अॅप ज्या नंबरवर नोंदणीकृत आहे, ते सिम कार्ड त्याच मोबाईलमध्ये सक्रिय असल्याची खात्री करून घ्यावी. अन्यथा 1 मार्चपासून अॅप्स वापरण्यात अडचणी येऊ शकतात.
हेही वाचा :
शाहिद कपूरच्या करियरमधील असा चित्रपट, जिथे हिरॉईनपेक्षाही मिळाले होते कमी पैसे!