राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या 28 जानेवारी रोजी बारामतीजवळ (investigation) झालेल्या विमान अपघाताबाबतचा प्राथमिक चौकशी अहवाल अखेर समोर आला आहे. अपघातानंतर जवळपास महिनाभरानंतर प्रसिद्ध झालेल्या या 22 पानी अहवालात धक्कादायक बाबींचा उल्लेख करण्यात आला आहे. विमान जमिनीवर आदळण्यापूर्वी एका झाडाला धडकले आणि त्यानंतर ते कोसळल्याची नोंद अहवालात करण्यात आली आहे.

या अपघाताचा तपास सध्या Aircraft Accident Investigation Bureau (AAIB) कडून सुरू असून प्राथमिक अहवालात अपघात एका एकाच कारणामुळे न घडता अनेक घटकांच्या एकत्र परिणामामुळे झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. हवामानातील प्रतिकूल परिस्थिती, विमानतळावरील मर्यादित पायाभूत सुविधा आणि ऑपरेशनल निर्णय यांचा एकत्रित परिणाम या दुर्घटनेला कारणीभूत ठरला असावा, असे नमूद करण्यात आले आहे. अंतिम निष्कर्ष कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर (CVR) आणि फ्लाइट डेटा रेकॉर्डर (FDR) यांच्या सखोल विश्लेषणानंतरच स्पष्ट होणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.
अहवालानुसार, बारामती येथे स्वतंत्र हवामान (investigation) निरीक्षण यंत्रणा उपलब्ध नाही. अपघाताच्या वेळी विमानतळ नियंत्रण मनोऱ्याने दृश्यमानता सुमारे 3000 मीटर असल्याचे सांगितले होते. मात्र व्हिज्युअल फ्लाइट रूल्स (VFR) अंतर्गत सुरक्षित लँडिंगसाठी किमान 5000 मीटर दृश्यमानता आवश्यक असते. प्रत्यक्षात अपघाताच्या वेळी दृश्यमानता केवळ 2000 मीटरपर्यंत घसरली होती. कमी दृश्यमानता, दृश्य भ्रम आणि टेबल-टॉप प्रकारची धावपट्टी या घटकांनी परिस्थिती अधिक गुंतागुंतीची केली असावी, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
VIP किंवा चार्टर जेटसाठी आवश्यक असलेली काही मूलभूत सुरक्षा (investigation) आणि नेव्हिगेशन साधने अपुरी असल्याची नोंदही अहवालात आहे. अनकंट्रोल्ड एअरफिल्डवरील मर्यादित सुविधा, धावपट्टीवरील फिकट मार्किंग आणि प्रतिकूल हवामान यामुळे लँडिंगचा प्रयत्न अधिक जोखमीचा ठरला असावा. विशेष म्हणजे, आतापर्यंत या अपघातामागे कोणताही थेट तांत्रिक बिघाड असल्याचा ठोस पुरावा समोर आलेला नाही. त्यामुळे आता CVR आणि FDR मधील माहितीच अंतिम कारणांवर प्रकाश टाकणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
या प्राथमिक निष्कर्षांमुळे विमान सुरक्षेबाबतचे अनेक प्रश्न पुन्हा ऐरणीवर आले असून अंतिम अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा :
शाहिद कपूरच्या करियरमधील असा चित्रपट, जिथे हिरॉईनपेक्षाही मिळाले होते कमी पैसे!