दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील (South Indian actor) लोकप्रिय अभिनेता Vijay Deverakonda आणि अभिनेत्री Rashmika Mandanna अखेर विवाहबंधनात अडकले असून त्यांच्या शाही लग्नसोहळ्याची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. भव्य सजावट, पारंपरिकता आणि आधुनिकतेचा सुंदर मिलाफ यामुळे हा विवाह सोहळा चाहत्यांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे.

लग्नानंतर या दोघांनीही आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम खात्यावर काही खास क्षणांचे फोटो (South Indian actor) शेअर केले होते. मात्र अलीकडे समोर आलेले काही नवीन फोटो त्यांच्या विवाहाचे नियोजन करणाऱ्या इव्हेंट कंपनीने प्रसिद्ध केले आहेत. या छायाचित्रांमुळे लग्नाच्या संकल्पनेबाबत आणि सजावटीच्या थीमबाबत अधिक माहिती समोर आली आहे.
रश्मिका आणि विजय यांनी आपल्या विवाहसोहळ्याद्वारे (South Indian actor) भारतीय परंपरा आणि समृद्ध वारसा अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला. “द पिरिऑडिक इरा” अशी संकल्पना ठेवून संपूर्ण सजावट करण्यात आली होती. या थीमनुसार विजय देवरकोंडा पारंपरिक पोशाखात हातात नक्षीदार तलवार घेताना दिसतो, ज्यामुळे राजेशाही वातावरणाची अनुभूती येते. तलवारीवरील कोरीव काम विशेष लक्षवेधी ठरले आहे.
विवाहस्थळाची सजावट साधी पण आकर्षक ठेवण्यात आली होती. पांढरा आणि लाल या रंगसंगतीत संपूर्ण परिसर सजवण्यात आला होता. निसर्गाशी एकरूप होईल अशी मांडणी करण्यात आल्याने कृत्रिमतेपेक्षा नैसर्गिक सौंदर्याला अधिक महत्त्व देण्यात आले.
याशिवाय परिसरात हत्तींच्या प्रतिकृती, (South Indian actor) मानवी शिल्पे आणि पारंपरिक डोलीचीही व्यवस्था करण्यात आली होती. रश्मिका डोलीत बसून येतानाचे काही फोटो विशेष व्हायरल होत आहेत. संपूर्ण सोहळा राजेशाही थाटात पार पडला असला तरी त्यामध्ये भारतीय संस्कृतीची झलक स्पष्टपणे दिसून येत होती.
लग्नानंतर हे नवदांपत्य आपल्या घरी परतले (South Indian actor) असले तरी त्यांच्या या भव्य विवाहसोहळ्याची चर्चा सोशल मीडियावर अजूनही रंगत आहे. चाहते त्यांच्या नव्या आयुष्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव करत असून या शाही सोहळ्याचे फोटो अजूनही मोठ्या प्रमाणावर शेअर केले जात आहेत.
हेही वाचा :
शाहिद कपूरच्या करियरमधील असा चित्रपट, जिथे हिरॉईनपेक्षाही मिळाले होते कमी पैसे!