२८ फेब्रुवारी २०२६ हा दिवस जम्मू-काश्मीरच्या क्रिकेट इतिहासात सुवर्णाक्षरांनी (history) नोंदवला गेला. जम्मू-काश्मीर क्रिकेट टीम ने पहिल्यांदाच रणजी ट्रॉफी जिंकत ऐतिहासिक कामगिरी केली. अंतिम सामना अनिर्णित राहिला असला तरी पहिल्या डावातील भक्कम आघाडीच्या जोरावर जम्मू-काश्मीरने विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.

अंतिम सामन्यात त्यांचा मुकाबला (history) बलाढ्य कर्नाटक क्रिकेट टीम विरुद्ध त्यांच्या घरच्या मैदानावर झाला. सामन्याच्या पहिल्याच दिवसापासून जम्मू-काश्मीरच्या गोलंदाज आणि फलंदाजांनी प्रभावी कामगिरी करत कर्नाटकवर दबाव निर्माण केला. पहिल्या डावात त्यांनी तब्बल २९१ धावांची आघाडी घेतली, जी अखेर निर्णायक ठरली. पाचव्या आणि शेवटच्या दिवशी जम्मू-काश्मीरने दुसऱ्या डावात ३४२ धावा उभारल्या आणि सामना ड्रॉ झाला. मात्र नियमानुसार पहिल्या डावातील आघाडीमुळे जम्मू-काश्मीरला विजेते घोषित करण्यात आले.
या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी जम्मू-काश्मीरचे (history) मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला स्वतः मैदानात उपस्थित होते. पहिल्या दिवसापासून ते संघाला प्रोत्साहन देताना दिसले. विजय निश्चित झाल्यानंतर त्यांनी खेळाडूंचे अभिनंदन करत २ कोटी रुपयांच्या बक्षिसाची घोषणा केली.
याशिवाय, भारतीय (history) क्रिकेट नियामक मंडळ कडूनही विजेत्या संघाला ५ कोटी रुपयांचे पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे, तर उपविजेत्या कर्नाटक संघाला ३ कोटी रुपये देण्यात येणार आहेत. जम्मू-काश्मीरच्या या यशामुळे राज्यातील क्रीडाविश्वात आनंदाचे वातावरण असून युवा खेळाडूंना नव्या प्रेरणेचा स्रोत मिळाला आहे.
हेही वाचा :
शाहिद कपूरच्या करियरमधील असा चित्रपट, जिथे हिरॉईनपेक्षाही मिळाले होते कमी पैसे!