बॉलिवूडमधील लोकप्रिय विनोदी अभिनेता राजपाल यादव पुन्हा एकदा चर्चेत (cheque bounce) आला आहे. 9 कोटी रुपयांच्या चेक बाउन्स प्रकरणामुळे काही काळ त्याला तुरुंगात राहावे लागले होते. नुकताच तो बाहेर आल्यानंतर मुंबईत पत्रकार परिषद घेत त्याने संपूर्ण प्रकरणावर खुलासा केला. यावेळी त्याने आपली बाजू स्पष्ट करत भविष्यातील योजनांबाबतही मोठा दावा केला.

राजपाल यादवने सांगितले की, 2010 साली (cheque bounce) प्रदर्शित झालेल्या अता पता लपता या चित्रपटात उद्योगपती माधव गोपाल अग्रवाल यांनी 5 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. हा चित्रपट त्याचा दिग्दर्शक म्हणून पहिलाच प्रयत्न होता. फिल्म सिटीमध्ये शूटिंगदरम्यान सुमारे अडीच हजार लोक काम करत होते. चित्रपटाचे सुमारे 70 टक्के काम पूर्ण होईपर्यंत 10 ते 12 कोटी रुपयांचा खर्च झाला होता. त्यानंतर दीड महिन्यांनी 9.5 कोटी रुपयांचा दुसरा करार करण्यात आला आणि त्यासाठी त्याने शाहपूर येथील जमीन गहाण ठेवली होती, असेही त्याने सांगितले.

या प्रकरणात त्याचे वकील भास्कर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, सुरुवातीला 5 कोटी (cheque bounce) रुपयांचे कर्ज देण्यात आले होते; मात्र पुढील करारात त्या रकमेवर मोठ्या प्रमाणात व्याज आकारण्यात आले. पाच कोटींच्या कर्जासाठी आठ कोटी रुपयांची मागणी करण्यात येत होती आणि तब्बल 60 टक्के व्याजाचा दावा केला जात होता. तक्रारदाराचा उद्देश राजपालला तुरुंगात टाकण्याचा होता आणि त्यामुळे मालमत्तेची कागदपत्रे स्वीकारण्यासही नकार देण्यात आला, असा आरोप त्यांनी केला.

राजपाल यादवने पुढे (cheque bounce) सांगितले की, प्रोडक्शन हाऊस सुरू करण्यामागे त्याचा वैयक्तिक हेतू नव्हता, तर आपल्या सहकाऱ्यांना काम मिळावे हा उद्देश होता. गेल्या 20 वर्षांत 50 हून अधिक लोकांसोबत व्यवहार केले असून कोणतीही अडचण निर्माण झाली नव्हती, असा दावा त्याने केला. येत्या काळात त्याचे 10 चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून त्यात भूत बांगला सारख्या प्रकल्पांचा समावेश आहे. 2026 पासून 2032 पर्यंत आपला ब्रँडिंग व्यवसाय 1200 कोटी रुपयांपर्यंत पोहोचेल, असा विश्वासही त्याने व्यक्त केला.

तिहार तुरुंगात असताना आर्थिक मदतीसाठी पुढे आलेल्या (cheque bounce) मित्रपरिवार, सहकलाकार आणि चाहत्यांचेही त्याने मनापासून आभार मानले. कठीण काळात मिळालेल्या पाठिंब्यामुळेच तो पुन्हा नव्या जोमाने उभा राहू शकला, असे सांगत राजपाल यादवने नव्या सुरुवातीची घोषणा केली.

हेही वाचा :

मोठी बातमी! भाविकांवर काळाचा घाला, श्रीरामपूर -संगमनेर रस्त्यावर भीषण अपघात, कार, ट्रकच्या धडकेत 6 जणांचा मृत्यू

शाहिद कपूरच्या करियरमधील असा चित्रपट, जिथे हिरॉईनपेक्षाही मिळाले होते कमी पैसे!

भारतात मान्सूनचे वेळापत्रक आणि दिशा का बदलत आहे? 6,800 KM अंतरावर सापडले कारण; शास्त्रज्ञांची झोप उडाली

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *