तुम्ही अंडी किंवा चिकन खात असाल तर सध्या समोर येत असलेल्या (bird flu) बातम्यांमुळे तुमच्या मनात संभ्रम निर्माण होणं स्वाभाविक आहे. बिहारसह काही राज्यांमध्ये बर्ड फ्लू म्हणजेच एव्हियन इन्फ्लूएंझाची प्रकरणे नोंदवली गेली आहेत. पाटणा परिसरात हजारो कोंबड्यांची कत्तल करण्यात आली असून प्रशासनाने काही भागात सतर्कतेचा इशारा दिला आहे. मात्र या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांनी कोंबडी आणि अंडी खाणे पूर्णपणे बंद करावे का, याबाबत तज्ज्ञांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे.

World Health Organization (WHO), Centers for Disease Control and Prevention (CDC) आणि Food Safety and Standards Authority of India (FSSAI) यांसारख्या आरोग्य संस्थांचे म्हणणे आहे की योग्य तापमानात पूर्णपणे शिजवलेले चिकन आणि अंडी खाणे सुरक्षित आहे. बर्ड फ्लूचा विषाणू 74 अंश सेल्सियस किंवा त्याहून अधिक तापमानात नष्ट होतो. त्यामुळे चिकन आतून व्यवस्थित शिजलेले असावे आणि अंड्याचा पिवळा व पांढरा भाग पूर्णपणे घट्ट झालेला असावा, असे तज्ज्ञ सांगतात. अर्धवट शिजवलेले किंवा कच्चे अंडे आणि चिकन टाळणे गरजेचे आहे.
बाजारात उपलब्ध होणाऱ्या कोंबड्या आणि अंडी याबाबतही (bird flu) प्रशासन दक्ष असते. ज्या शेतांमध्ये संसर्ग आढळतो, तेथील कोंबड्यांना वेगळे करून त्यांची विल्हेवाट लावली जाते. अशा फार्ममधील उत्पादने अन्नसाखळीत येऊ दिली जात नाहीत. पशुसंवर्धन विभाग आणि अन्न सुरक्षा यंत्रणा नियमित तपासणी करत असतात. त्यामुळे बाजारातील बहुतांश उत्पादने निरोगी फार्ममधूनच येतात, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
बर्ड फ्लू प्रामुख्याने संक्रमित पक्ष्यांच्या थेट संपर्कातून (bird flu) मानवांमध्ये पसरतो. शेतातील कामगार किंवा आजारी कोंबड्यांशी थेट संपर्कात येणाऱ्या व्यक्तींना जास्त धोका असतो. जागतिक स्तरावर लाखो लोक चिकन आणि अंडी खात असले तरी व्यवस्थित शिजवलेले अन्न खाल्ल्याने बर्ड फ्लू झाल्याची ठोस उदाहरणे अत्यंत दुर्मिळ आहेत. अन्नाद्वारे संसर्गाची शक्यता फार कमी असून तीही प्रामुख्याने कच्च्या किंवा अर्धवट शिजवलेल्या पदार्थांमध्ये असते.
स्वयंपाक करताना स्वच्छतेची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कच्च्या चिकनला स्पर्श केल्यानंतर साबणाने हात धुणे, कच्च्या मांसासाठी वेगळी भांडी व चॉपिंग बोर्ड वापरणे आणि कच्चे व शिजलेले अन्न वेगळे ठेवणे या सवयी संसर्गाचा धोका कमी करतात.एकूणच, सध्या काही भागांत बर्ड फ्लूची प्रकरणे समोर येत असली तरी घाबरण्याचे कारण नाही. योग्य प्रकारे शिजवलेले चिकन आणि अंडी सुरक्षित आहेत, असे आरोग्य तज्ज्ञांचे एकमत आहे. अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करणे आणि स्वच्छतेच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे हेच सध्याच्या परिस्थितीत सर्वात महत्त्वाचे ठरते.
हेही वाचा :
शाहिद कपूरच्या करियरमधील असा चित्रपट, जिथे हिरॉईनपेक्षाही मिळाले होते कमी पैसे!