वास्तुशास्त्रानुसार आपल्या दैनंदिन आयुष्यात घडणाऱ्या अनेक छोट्या (Vastu Shastra) गोष्टींनाही विशेष महत्त्व दिलं जातं. प्रत्येक घटना, प्रत्येक प्राणी किंवा पक्षी काही ना काही संकेत देत असतो, अशी पारंपरिक समजूत आहे. अशाच दोन गोष्टींबाबत अनेकांच्या मनात उत्सुकता असते – जेवताना ताटात केस आढळणे आणि घरात वारंवार मांजर येणे.

जेवताना ताटात केस आढळणे ही गोष्ट (Vastu Shastra) प्रथमदर्शनी आरोग्याच्या दृष्टीने त्रासदायक वाटते. स्वच्छतेच्या दृष्टीने हे नक्कीच चुकीचं मानलं जातं. मात्र वास्तुशास्त्रात या घटनेला केवळ स्वच्छतेपुरतं मर्यादित न ठेवता त्यामागे संकेतही जोडला गेला आहे. ताटात केस सापडणं हा अशुभ संकेत मानला जातो. अशा घटनेनंतर येणाऱ्या काळात एखादी अडचण, तणावपूर्ण प्रसंग किंवा अनपेक्षित अडथळा निर्माण होऊ शकतो, असा समज आहे. त्यामुळे अशावेळी मन शांत ठेवून निर्णय घेण्याची आणि सावध राहण्याची सूचना केली जाते.
दुसरीकडे, घरात वारंवार मांजर येण्याबाबत मात्र (Vastu Shastra) वेगवेगळी मतप्रवाह आढळतात. काही जण याला अशुभ मानतात, तर वास्तुशास्त्रात मात्र याकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहिलं जातं. वास्तुशास्त्रानुसार मांजर ही संवेदनशील प्राणी असून ती नकारात्मक ऊर्जा ओळखू शकते. ज्या ठिकाणी वातावरण प्रसन्न आणि सकारात्मक असतं, तिथेच मांजर सहज वावरते. त्यामुळे एखाद्या घरात मांजर वारंवार येत असेल, तर त्या घरातील ऊर्जा चांगली असल्याचा तो संकेत मानला जातो.
अर्थात, या सर्व गोष्टी पारंपरिक श्रद्धा आणि समजुतींवर आधारित आहेत. तरीही अशा संकेतांमधून लोक आपल्या दैनंदिन आयुष्यातील घटनांकडे वेगळ्या नजरेने पाहतात आणि त्यातून काहीतरी सकारात्मक घेण्याचा प्रयत्न करतात.
हेही वाचा :
शाहिद कपूरच्या करियरमधील असा चित्रपट, जिथे हिरॉईनपेक्षाही मिळाले होते कमी पैसे!