होळीच्या सणाच्या दिवशी उत्तर प्रदेशातील उत्तर प्रदेश मध्ये एक धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना घडली. बहराइच जिल्ह्यातील बसंतपूर उदल या गावात मध्यरात्रीच्या सुमारास एकाच कुटुंबावर कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला. (Holi) या भीषण हल्ल्यात चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी आहेत. मृतांमध्ये तीन महिलांसह एका पुरुषाचा समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास घडली. घरातील सदस्य झोपेत असताना अचानक हल्लेखोराने कुऱ्हाडीने सपासप वार करण्यास सुरुवात केली. अचानक आरडाओरडा ऐकून शेजारी जागे झाले, मात्र तोपर्यंत घराचे अंगण रक्ताने माखले होते. परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.
या हल्ल्यात शीतला (८२), संजू देवी (६०), पार्वती (२०) आणि बदलूराम (६२) यांचा जागीच मृत्यू झाला. (Holi) घराच्या अंगणात एका बाजूला नवरा-बायको तर दुसऱ्या बाजूला आई आणि मुलगी रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले. दोन जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कुटुंबातील एक लहान मुलगा मात्र सुदैवाने बचावला असून सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, दोन भावांमध्ये झालेल्या वादातून ही घटना घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. होळीच्या सणाच्या आनंदात गाव रंगले असताना घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण परिसर हादरला आहे. (Holi) पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तपास सुरू केला असून आरोपीचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. गावात तणावपूर्ण शांतता असून पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
हेही वाचा :
शाहिद कपूरच्या करियरमधील असा चित्रपट, जिथे हिरॉईनपेक्षाही मिळाले होते कमी पैसे!