सध्या अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. हे युद्ध असंच काही दिवस सुरू राहिलं तर जगात तिसरं महायुद्ध सुरू होईल अशी भीती व्यक्त केली जात आहे.

इराण, इस्त्रायल आणि अमेरिकेमध्ये सध्या भीषण युद्ध सुरू आहे, या युद्धामुळे संपूर्ण जगच मोठ्या संकटात सापडलं आहे. जर हे युद्ध आणखी काही दिवस सुरू राहिलं तर जगात महायुद्ध सुरू होऊ शकतं अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. इराणकडून अमेरिकेची नाकेबंदी करण्यात आली आहे. एकीकडे इराणने होर्मुजची सामुद्रधुनी अमेरिका आणि युरोपीयन राष्ट्रांसाठी बंद केली आहे, तर दुसरीकडे इराणकडून आता सुएज कालवा देखील बंद करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. जर सुएज कालवा वाहतुकीसाठी बदं झाल्यास युरोपीयन राष्ट्रांची मोठी कोंडी होऊ शकते. (America) अशा परिस्थितीमध्ये हे युद्ध तिसऱ्या महायुद्धाकडे जाऊ शकतं अशी भाती व्यक्त केली जात आहे. मात्र तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का, जर समजा तिसरं महायुद्ध झालं तर सर्वात जास्त कोणत्या देशाचं नुकसान होऊ शकतं?
जर जगात तिसरं महायुद्ध सुरू झालं तर त्याचा सर्वात जास्त फटका हा मध्य पूर्वेत बसेल. इराण आणि इस्त्रायल हे या युद्धाचे दोन टोकं आहेत. जर जगात तिसरं महायुद्ध सुरू झालं तर इस्त्रायल आपल्या सुरक्षेसाठी सर्वात पहिल्यांदा इराणच्या अणु ऊर्जा केंद्रांवर हल्ला करेल. तर इराण इस्त्रायलच्या नागरी भागांमध्ये हल्ले करेल. या महायुद्धामध्ये सर्वात आधी हे दोन देश उद्ध्वस्त होतील. या देशांमध्ये मोठ्या प्रमाणात तेलाचे साठे आहेत. जर तेल साठ्यांना आग लागली, (America) तर त्यामध्ये सर्व काही जळून खाक होईल.
जर समजा तिसरं महायुद्ध सुरू झालं तर रशिया युक्रेनवरील आपले हल्ले अधिक तीव्र करेल. एवढंच नाही तर नाटो देशांकडून युक्रेनला सहकार्य केलं जात आहे. (America) यामुळे रशियाच्या मनात नाटो देशांबद्दल नाराजी आहे. त्यामुळे रशिया नाटो देशांवर देखील हल्ले करू शकतं, या युद्धात इराण आणि इस्त्रायलनंतर तिसरा बळी हा पोलंडचा जाण्याची शक्यता आहे. तसेच जे बलाढ्य देश आहेत, अमेरिका चीन या सारखे यांच्या मोठ्या शहरांना शत्रू राष्ट्रांकडून टार्गेट केलं जाऊ शकतं. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी होऊ शकते.
जर तिसऱ्या महायुद्धाची सुरुवात झाली तर पुरवठा साखरी पूर्णपणे खंडित होईल, याचा सर्वात मोठा फटका हा आफ्रिका खंडातील छोट्या आणि गरीब देशांना बसेल. या देशांमध्ये भुखमारीने अनेक नागरिकांचा मृत्यू होऊ शकतो.
हेही वाचा :
युद्धाचा मोठा फटका, शेअर मार्केट कोसळलं, गुंतवणूकदारांचं प्रचंड नुकसान
वाढत्या महागाईमुळे बचत कमी झाली, सामना कसा करायचा, जाणून घ्या
कर्जातून मुक्त व्हायचंय? मग करा वास्तुशास्त्रामधील हे सोपे उपाय, पैशांची चिंता होईल झटक्यात दूर