पीएम किसान योजनेचा 22 वा हप्ता उद्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. पण या शेतकर्यांना हा हप्ता मिळणार नाही. त्यामागे एक मोठे कारण आहे. अनेक शेतकऱ्यांनी वारंवार सांगूनही या अटीची पूर्तता न केल्याने त्यांना फटका बसणार आहे.

पीएम किसान योजनेची मोठी अपडेट समोर आली आहे. या योजनेचा 22 वा हप्ता उद्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. 13 मार्च रोजी हा हप्ता जमा करण्याची अधिकृत माहिती समोर आली आहे. पण या योजनेसाठी ई-केवायसीसोबतच फार्मर आयडी पण आवश्यक आहे. त्यामुळे हा हप्ता मिळवण्यासाठी फार्मर आयडीची गरज आहे.(farmers) त्यासाठी ही प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.जर ही अट पूर्ण केली नाही तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यात या योजनेची रक्कम जमा होणार नाही .
पीएम किसान योजना ही शेतकऱ्यांमधील लोकप्रिय योजना आहे. या योजनेत वार्षिक 6 हजार रुपये थेट अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येतात. डीबीटी अंतर्गत ही रक्कम जमा होते. वर्षाला दोन हजार रुपयांचे तीन हप्ते जमा होतात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी करावी लागते. तसेच या योजनेसाठी ची पण गरज आहे.
पीएम किसान योजनेचे आतापर्यंत 21 हप्ते जमा करण्यात आले आहे. तर उद्या 13 मार्च रोजी 22 वा हप्ता शेतकऱ्यांना मिळेल. तर योजनेसाठी केंद्र सरकारने एक महत्त्वाची अट घातली आहे. (farmers) त्यानुसार, शेतकऱ्यांना फार्मर आयडी सादर केल्याशिवाय या योजनेचा कोणताही लाभ मिळणार नाही. शेतकरी योजनेत बोगस लाभार्थी ओळखता यावे आणि त्यांना योजनेच्या बाहेर करता यावे यासाठी ईकेवायसी आणि फार्मर आयडीची सक्ती करण्यात आली आहे. फार्मर आयडी, शेतकऱ्यांचे ओळखपत्र तयार करणे ही सोपी पद्धत आहे. हे एक प्रकारे शेतकऱ्यांचे डिजिटल प्रोफाईल आणि ओळखपत्र आहे.
शेतकऱ्यांना वर फार्मर आयडी तयार करता येईल. (farmers) याठिकाणी युझर आयडी आणि पासवर्ड तयार करावा लागेल. अटी आणि शर्तीसह फॉर्म सबमिट करावा लागेल. यानंतर आधार कार्डशी लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी येईल.तो सबमिट करुन पुढील प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. फार्मर आयडीमध्ये शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती जतन होते. शेतकऱ्यांची जमीन कोणत्या दिशेला आहे. जमिनीचे क्षेत्रफळ किती आहे. सध्या शेतकऱ्याच्या शेतात कोणते पीक आहे. वर्षभरात तो कोणत्या पिकाची लागवड करतो याची माहिती फार्मर आयडीत असते. त्यामुळे पीएम किसान योजनेचा लाभ योग्य लाभार्थ्यांना मिळत असल्याची सरकारला खात्री पटेल.
शेतकऱ्यांनी या पोर्टलवर नवीन पासवर्ड तयार करावा आणि तो सेव्ह करावा. या नवीन आयडी आणि पासवर्डसह लॉगिन करावे. त्यानंतर मध्ये निवडून वर क्लिक करावे. आता जमिनीचा खासरा क्रमांक आणि जमिनीची इतर माहिती नोंदणी करावी. त्यामुळे शेतकऱ्यांसाठीच्या कोणत्याच योजनापासून ते वंचित होणार नाहीत.
हेही वाचा :
युद्धाचा मोठा फटका, शेअर मार्केट कोसळलं, गुंतवणूकदारांचं प्रचंड नुकसान
वाढत्या महागाईमुळे बचत कमी झाली, सामना कसा करायचा, जाणून घ्या
कर्जातून मुक्त व्हायचंय? मग करा वास्तुशास्त्रामधील हे सोपे उपाय, पैशांची चिंता होईल झटक्यात दूर