लग्न लावून परत येत असताना वरातीच्या बसला अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात एक जण ठार तर नऊ जण गंभीर जखमी झाले आहेत. ओव्हरटेक करत असताना बस झुडुपात शिरल्याने हा अपघात झाल्याचे म्हटले जात आहे.

लग्न समारंभ आटोपून घराकडे येत असलेल्या वऱ्हाडाच्या खाजगी बसला अपघात झाल्याने त्यात एक जण ठार तर नऊ जण गंभीर जखमी झाल्याची घटना पहाटे गोंदियाजवळील कारंजाजवळ घडली आहे. या बसचा चालक ओव्हरटेक करत असताना नियंत्रण सुटल्याने बस शेजारील झुडपात शिरल्याने बसच्या पुढील भागाची नासधुस झाली. (Bus) यातील चालकाने बसमधून उडी मारुन घटना स्थळावरुन पाबोरा केला असून पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील चोपा- मोहाडी येथील वरखडे कुटुंबातील मंडळी लग्न सोहळा आटोपून येत होती. मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील खैरलांजी मॅकेपार येथे विवाहासाठी ही वऱ्हाडी मंडळी गेली होती. रात्री लग्न सोहळा आटोपून ही मंडळी परतत असताना पहाटे गोंदियातील कारंजा येथे बस चालकाचे नियंत्रण ओव्हरटेक करताना सुटले आणि ही बस जंगलातील झुडुपात घुसली आणि अनेक झाडांना धडका देत ही बस तशीच काही किलोमीटर आत घुसली, (Bus) त्यावेळी चालकाने उडी मारुन स्वत:चे प्राण वाचवले आणि तो पळून गेला. या भीषण अपघातात सोनू घनश्याम उईके (वय २७, रा. वाडी, नागपूर ) याचा मृत्यू झाला. तर इतर नऊ जण गंभीर जखमी झाले आहेत.
ही भरधाव बस ओव्हरटेक करताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही बस रस्त्याच्या कडेला असलेल्या जंगलात शिरली. यामुळे झाडांना धडकून या बसच्या समोरील काचा तुटल्या आणि अनेक जण त्यामुळे गंभीर जखमी झाले. (Bus) यात समोर बसलेल्या सोनू घनश्याम उईके याचा मृत्यू झाला. तर चालकाने उडी मारुन पयालन केले. या अपघाताची माहिती कळताच स्थानिकांनी काही जणांना खिडकीतून बाहेर काढले आणि रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या घटनेत झाडाझुडुपांना ठोकर देत बस काही किमी धावल्याने अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी नजिकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पुढील तपास पोलिस करीत आहेत.
हेही वाचा :
युद्धाचा मोठा फटका, शेअर मार्केट कोसळलं, गुंतवणूकदारांचं प्रचंड नुकसान
वाढत्या महागाईमुळे बचत कमी झाली, सामना कसा करायचा, जाणून घ्या
कर्जातून मुक्त व्हायचंय? मग करा वास्तुशास्त्रामधील हे सोपे उपाय, पैशांची चिंता होईल झटक्यात दूर