आजकाल अनेक लोकं कर्जाच्या जाळ्यात अडकत आहेत. अशातच एका महिलेला कर्मचाऱ्याने कर्ज माफ करून देण्याचं आमिष दाखवत अत्याचार केला. महिला विनवणी करत राहिली मात्र नराधमाने ओलांडल्या सर्व मर्यादा… नंतर काय घडलं? जाणून घ्या.

फायनान्स कंपन्यांच्या वाढत्या जाळ्यामुळे कर्ज घेणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. छोट्या-मोठ्या गरजांसाठी लोक कर्ज घेतात आणि नंतर ईएमआयच्या चक्रात अडकतात. अनेकदा कर्ज वसुलीसाठी नियुक्त केलेले कर्मचारी ग्राहकांवर सतत तगादा लावत असल्याच्या तक्रारीही समोर येत असतात. काही वेळा या वसुली प्रक्रियेतून गंभीर गुन्हेही घडताना दिसतात. (hotel) अशाच प्रकारची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कर्ज माफ करून देण्याचे आमिष दाखवत एका वसुली कर्मचाऱ्याने विवाहित महिलेचा गैरफायदा घेतल्याचा आरोप आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पीडितेच्या कुटुंबाने पोलिसांकडे धाव घेतली आहे. ही घटना रुद्रपूर परिसरातील असल्याची माहिती मिळत आहे.

कर्जामुळे सुरू झाला संपर्क मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिलेच्या पतीने एका फायनान्स कंपनीकडून 50 हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. सुरुवातीला तो नियमितपणे हप्ते भरत होता. मात्र या दरम्यान कंपनीकडून वसुलीसाठी येणाऱ्या एका कर्मचाऱ्याचा घराशी संपर्क वाढू लागला.त्या कर्मचाऱ्याने महिलेबरोबर वेगळ्याच प्रकारे बोलणे सुरू केले. त्याने कर्ज पूर्णपणे माफ करून देण्याचे आश्वासन दिले. मात्र त्यासाठी महिलेपुढे अयोग्य मागणी ठेवण्यात आली.

शरीरसुखाची ठेवली अट तक्रारीनुसार, आरोपी कर्मचाऱ्याने कर्जमाफीच्या बदल्यात महिलेवर दबाव टाकण्यास सुरुवात केली. त्याने कर्जाची चिंता मिटवून देण्याचे आमिष दाखवत शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप आहे.महिलेने सुरुवातीला या मागणीला विरोध केला. मात्र सततचा दबाव आणि कर्जाची भीती यामुळे ती मानसिकदृष्ट्या अस्वस्थ झाली होती, असेही सांगितले जात आहे.

हॉटेलमध्ये बोलावून अत्याचार पीडित महिलेच्या म्हणण्यानुसार, आरोपीने 2 फेब्रुवारी रोजी तिला एका हॉटेलमध्ये बोलावले. तिथे कर्जाबाबत बोलायचे असल्याचे सांगून तिला भेटण्यास भाग पाडले.महिलेने दिलेल्या माहितीनुसार, त्या ठिकाणी आरोपीने तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला.(hotel) तिने त्याला सोडून देण्याची विनंती केली आणि कुटुंबाच्या मानमरातबाचा विचार करण्यास सांगितले, मात्र आरोपीने तिचे काहीही ऐकले नाही.घटनेनंतर आरोपीने महिलेला विश्वास देत राहिला की तिचे कर्ज लवकरच माफ केले जाईल. त्यामुळे ती काही काळ शांत राहिली होती.

नोटीस आल्यानंतर उघड झाला प्रकार महिलेशी संबंध बांधल्यानंतरच्या काही दिवसांतच बँकेकडून कर्ज वसुलीची नोटीस आली. बँकेचे कर्मचारी घरी आल्यानंतर कर्ज माफ झाले नसल्याचे स्पष्ट झाले. (hotel) यानंतर महिला मोठ्या मानसिक तणावाखाली गेली. तिची तब्येत बिघडू लागल्यावर पतीने विचारपूस केली आणि त्यावेळी तिने संपूर्ण घटना सांगितली. त्यानंतर पतीने पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलिसांकडून आरोपीचा शोध घेतला जात आहे.

हेही वाचा :

युद्धाचा मोठा फटका, शेअर मार्केट कोसळलं, गुंतवणूकदारांचं प्रचंड नुकसान

वाढत्या महागाईमुळे बचत कमी झाली, सामना कसा करायचा, जाणून घ्या

कर्जातून मुक्त व्हायचंय? मग करा वास्तुशास्त्रामधील हे सोपे उपाय, पैशांची चिंता होईल झटक्यात दूर

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *