VIDEO : भीषण हिट अँड रन एकाचा मृत्यू, चौघांची प्रकृती चिंताजनक
अहिल्यानगर शहरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. या (market)बातमीनुसार शहरात हिट अँड रनची घटना घडली आहे. शहरातील मार्केट यार्ड परिसरातील महात्मा फुले चौकात ही घटना घडली असून यात एकाचा मृत्यू झाला आहे. तर चौघेजण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवणाऱ्या ड्रायव्हर विरोधात कोतवाली पोलिसांनी (market)ताब्यात घेतले असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात येत आहे. रविंद्र रमेश कानडे वय 32 , राहणार कानडे मळा, सोलापूर रोड, अहिल्यानगर असं मयताचे नाव आहे.
नगर शहरात हिट अँड रन ची घटना. घटनेत दोन जण गंभीर जखमी
— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) November 25, 2024
–#HitandRunLaw #HitandRunAccident #ahilyanagar #ahmednagar #HitANDRun #MaharashtraNews #maharashtra #LetsUppNews #LetsUppMarathi pic.twitter.com/YCjNP5SP1S
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील मार्केट यार्ड परिसरातील महात्मा फुले चौकात संध्याकाळी 7 च्या सुमारास XUV 500 कारने दुचाकी आणि पायी चालणाऱ्या नागरिकांना धडक (market)दिली.या दुर्घटनेत एकाचा जागीच मृत्यू झाला तर चौघेजण गंभीर जखमी झाले आहे. सध्या जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे तर मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवणाऱ्या ड्रायव्हर विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येत आहे
हेही वाचा :
आज उत्पत्ती एकादशीला ‘या’ राशींना होणार अचानक धनलाभ!
MS धोनीचा खास भिडू मुंबई इंडियन्सने हिसकावला
अर्जुन कपूरसोबत ब्रेकअप? मलायका अरोराने रिलेशनशिप स्टेटसचा केला खुलासा