…अन् राजकुमार रावला विमानतळावर अडवलं, फोनमध्ये होते दहशतवाद्यांचे Photo, VIDEO

2017 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ओमर्टा’ नं बॉक्स ऑफिसवर काही चांगली कमाई केली नाही. पण क्रिटिक्सकडून या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला. जवळपास 18 कोटींमध्ये बनलेल्या या चित्रपटानं फक्त 4.5 कोटींच्या जवळपास कमाई केली होती. पण IMDb वर त्याची रेटिंग 7 पेक्षा जास्त आहे. हंसल मेहता यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाची पटकथा ही सत्यघटनेवर आधारीत आहे. या चित्रपटात राजकुमार रावनं एका दहशतवाद्याची भूमिका साकारली होती. याच भूमिकेत राजकुमार राव(actor) इतका गुंतला होता की त्यानं अनेकदा अशा काही गोष्टी केल्या ज्यानं तो स्वत: चा घाबरला.

राजकुमार रावनं(actor)चित्रपटात एका ब्रिटिश जो मुळचा पाकिस्तानी असलेल्या आतंकवादी अहमद उमर सईद शेखची भूमिका साकारली होती. या दहशतवाद्यानं 1994 मध्ये भारतात परदेशी पर्यटकांचे अपहरण केले. तर 1999 मध्ये IC-814 विमान हायजॅक केलं आणि त्यनंतर तो 2002 मध्ये अमेरिकेतील पत्रकार डॅनियल पर्लच्या किडनॅप आणि हत्या प्रकरणात सहभागी झाला.

राजकुमार रावनं या भूमिकेची तयारी करण्यासाठी खूप मेहनत केली आणि या सगळ्यात त्याची विचार करण्याची पद्धत देखील एका दहशतवाद्यासारखी झाली होती की अनेकदा त्याला या सगळ्यामुळे अडचणींचा सामना करावा लागला होता.

राजकुमार रावनं (actor)सांगितलं की या भूमिकाला योग्य पद्धतीनं समजून घेण्यासाठी आणि शिकण्यासाठी तो दहशतवाद्यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ त्याच्या फोनमध्ये ठेवायचा. एकदा राजकुमार रावला त्याचा तपास करण्यासाठी विमानतळावर अचानक बोलावण्यात आलं तेव्हा अचानक त्याच्या फोनमध्ये असलेल्या फोटोंविषयी आणि व्हिडीओची त्याला आठवण झाली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Soha (@sakpataudi)

 

कोणत्याही प्रकारची त्याच्यावर संशय होईल याआधई त्यानं संधी पाहता ते सगळं डिलीट केलं. इतकंच नाही तर त्यानं हे देखील सांगितलं की या सगळ्याचा त्याच्या मेंदूवर देखील परिणाम झाला होता.

राजकुमार रावनं त्याच्या दुसऱ्या चित्रपटातील प्रमोशनच्या वेळी सांगितलं की ‘ओमर्टा’ ची भूमिका त्याच्या मनावर खूप मोठी छाप सोडून गेली. त्याला त्याची जाणीव तेव्हा झाली जेव्हा त्यानं एक दहशतवादी हल्ल्याची क्लिप पाहिली आणि त्याला पाहताच त्याची पहिली प्रतिक्रिया ही होती की ‘बरं झालं.’

राजकुमार रावनं सांगितलं की त्याची ही प्रतिक्रिया पाहता त्याला जाणवलं की तो हे काय बोलून गेला. त्यानं त्या दिवसापासून त्याच्या भूमिकेवर काम करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, वादामुळे राजकुमार रावचा हा चित्रपट ‘कॅनडा’ मध्ये प्रदर्शित झालेला नाही.

हेही वाचा :