विद्यार्थ्यांनो, ST पासची चिंता मिटली! सरकारने घेतला मोठा निर्णय

महाराष्ट्रातील शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी(Students) एक दिलासादायक निर्णय जाहीर करण्यात आला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या पुढाकाराने आता विद्यार्थ्यांना एसटी बस पास थेट त्यांच्या शाळा किंवा महाविद्यालयांमध्येच वितरित करण्यात येणार आहे. यामुळे लाखो विद्यार्थ्यांना एसटी आगारात रांगेत उभं राहण्याची गरज भासणार नाही.

 

विद्यार्थ्यांना ६६.६६% सवलत; विद्यार्थिनींसाठी मोफत पास योजना :
शैक्षणिक वर्ष १६ जूनपासून सुरू होत असताना, ‘एसटी पास थेट तुमच्या शाळेत’ या उपक्रमाची अंमलबजावणी आजपासून राज्यभरात करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेतच पास मिळाल्यामुळे त्यांचा मौल्यवान शैक्षणिक वेळ वाचणार असून, पास मिळवण्याची प्रक्रिया अधिक सोपी आणि सुलभ होणार आहे.

राज्य सरकारकडून एसटी बस प्रवासासाठी विद्यार्थ्यांना (Students)६६.६६% इतकी सवलत देण्यात येते. यामुळे त्यांना मासिक पाससाठी केवळ ३३.३३% रक्कम भरावी लागते. तसेच, “पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजना” अंतर्गत बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थिनींना एसटी बसचा प्रवास मोफत मिळतो.

शाळांना सूचना देऊन यादी तयार करण्याचे निर्देश :
आतापर्यंत या पाससाठी अनेक विद्यार्थ्यांना लांब रांगेत उभं राहावं लागत होतं, किंवा शाळांनी गट करून एसटी आगार गाठावे लागत होते. मात्र, या नव्या निर्णयामुळे शाळांच्या समन्वयातून यादी तयार करून संबंधित आगार व्यवस्थापकांकडे पाठवली जाईल, आणि पास थेट विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवले जातील.

राज्यातील सर्व एसटी आगार व्यवस्थापकांना स्थानिक शाळा आणि महाविद्यालयांशी समन्वय साधून, मुख्याध्यापक व प्राचार्य यांना पत्र पाठवण्यात आले आहे. या पत्राद्वारे विद्यार्थ्यांची(Students) यादी तयार ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या यादीच्या आधारे थेट पास वितरण करण्यात येईल. या उपक्रमाचा फायदा राज्यातील लाखो विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना होणार आहे.

हेही वाचा :