त्याचे 300 तुकडे केले, नंतर बॉयफ्रेंडसोबत शरीरसंबंध, सुंदर हिरोईनचा भयानक कांड!

सिनेसृष्टी हे असे क्षेत्र आहे जिते एखादा गॉडफादर भेटला की मोठं नाव कमवता येऊ शकतं.(pieces) सुरुवातीच्या काळात मदत केलेल्या लोकांना कधीच विसरायचं नसतं. आजखडीला सिनेजगतात मोठं नाव असलेले असे काही चेहरे आहेत, जे आपल्या सुरुवातीच्या काळातील लोकांना विसरत नाहीत. एक अभिनेत्री मात्र सर्वांपेक्षा वेगळी निघाली. ज्याने करिअर बनण्यास तिला मदत केली होती, त्याचाच क्रूरतेने खून केला होता. आपल्या प्रियकराला सोबत घेऊन तिने तिला मदत करणाऱ्याच्या शरीराचे तब्बल 300 तुकडे केले होते. विशेष म्हणजे तिने खून करून बॉयफ्रेंडसोबत शरीरसंबंध ठेवले होते. मरिया सुसेराज असे या अभिनेत्रीचे नाव आहे.

कन्नड सिनेसृष्टीतील मरिया सुसेराज हिला नीरज ग्रोवरने सुरुवातीच्या काळात खूप मदत केली होती. नीरज ग्रोवर हा टेलिव्हिजन एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करायचा. नीरज ग्रोवर तिला मालिकांत भूमिका द्यायचा. मरियाच्या ऑडिशनसाठीही नीरजने पैसे खर्च केले होते. मरियाला तिचे अपार्टमेंट बदलायचे होते. त्यावेळीही नीरजने तिला मदत केली होती. त्यानंतर मात्र मोठ्या अचंबित करणाऱ्या घटना घडल्या. नीरज अचानक एक दिवस गायब झाला होता. त्याचा पुढच्या कित्येक दिवस शोध घेतला जात होता. हे प्रकरण पोलिसांत गेल्यानंतर मरियाची चौकशी करण्यात आली होती आणि हे खून प्रकरण समोर आले होते.

मिळालेल्या माहितीनुसार मरिया सुसेराज आणि लेफ्टनंट जेरोम मॅथ्यू हे एकमेकांवर प्रेम करायचे.(pieces) दोघांचाही साखरपुडा झाला होता. मात्र नीरज मरियाची मदत करतोय हे मॅथ्यूला आवडत नव्हते. मरिया एके दिवशी तिचे घर बदलत होती. ती दुसऱ्या अपार्टमेंटमध्ये राहायला जात होती. त्यावेळी नीरज मरियाला घर बदलण्यासाठी मदत करत होता.

त्याच वेळी मॅत्यू मरियाच्या घरी पोहोचलो होता. त्याने दरवाजाची घंटी वाजवली होती. पण आतून दरवाजा उघडला गेला नाही. त्यानंतर मॅथ्यूने रागात येऊन दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला. मॅथ्यू रागात घरात घुसला तेव्हा नीरज पलंगावर झोपलेला होता. हे पाहून मॅथ्यलूा जास्तच राग आला होता. रागात येत तो स्वयंपाकघरात गेला आणि त्याने चाकू आणऊन नीरजवर अनेक वार केले. यात नीरज यांचा मृत्यू झाला.

ही हत्या झाल्यानंतर मरियाने नीरजच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली. तिच्या घरात सगळीकडे रक्त साचले होते.(pieces) त्या सगळ्या घराची तिने साफसफाई केली. त्यानंतर नीरजचा मृतदेह दुसरीकडे ठेवून मरिया आणि मॅथ्यूने शरीरसंबंध प्रस्थापित केले होते, असे म्हटले जाते. दरम्यान, नीरजच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मरिया आणि मॅथ्यू यांनी शॉपिंग मॉलमध्ये जाऊन चाकू, प्लास्टिकची बॅग, पेट्रोल खरेदी केले. त्यांनी नीरजच्या मृतदेहाचे एकूण 300 तुकडे केले आणि एका जागेवर नेऊन ते जाळून टाकले. पोलिसांनी मात्र तिची कसून चौकशी केली. नंतर तिने आम्हीच नीरजचा खून केल्याचं तिने मान्य केलं.

हेही वाचा :