अपंग व्यक्तीला अर्धनग्न करत केलं धक्कादायक कृत्य; हृदय हेलावून टाकणारी दृश्य अन्…Video Viral

अनेकदा आपल्या डोळ्यांसमोर अशा काही घटना येतात की त्यांना पाहताच आपण खरंच कलियुगात जन्म घेतला आहे याची जाणीव होते. दिवसेंदिवस कोणत्या ना कोणत्या घटना समोर येतात ज्या माणसाच्या क्रूरतेचा इशारा दर्शवतात. सोशल मीडियावरही यासंबंधीचे अनेक व्हिडिओज(Video ) व्हायरल होत असतात आणि आताही असेच काहीसे घडून आले आहे.

मध्य प्रदेशातील एक व्हिडिओ(Video ) सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे ज्यात काही लोक एका अपंग व्यक्तीला अर्धनग्न करत बेदम मारहाण करताना दिसून येत आहे. या घटनेचा फुटेज आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केले जात असून नक्की काय घडले ते चला सविस्तर जाणून घेऊया.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात, दुकानदार अर्धनग्न अवस्थेत दिसत आहे. एका व्यक्तीने त्याला पकडून ठेवले आहे तर दुसरा व्यक्ती त्याला काठीने मारत आहे. पीडित व्यक्ती ओरडताना आणि त्याला वाचवण्याची विनंती करताना देखील दिसून येतो. पीडित व्यक्ती हा अपंग असून स्थानिकांनी काही अज्ञात वादावरून त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली.

 

माहितीनुसार, पीडितांच्या कुटूंबियांनी आरोपींवर आता कठोर कारवाईची मागणी केली आहे तर या घटनेमुळे स्थानिकांमध्ये आता संतापाची लाट उसळली आहे. घटनेचा हा व्हिडिओ @FreePressMP या अधिकृत एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कमेंटमध्ये घटनेची माहिती देण्यात आली आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून वेगाने हा व्हिडिओ आता शेअर केला जात आहे.

हेही वाचा :