या सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक करा, मिळेल टॅक्सपासून सूट आणि जास्तीत जास्त परतावा

केंद्र सरकारने नुकतेच बचत योजनांवरील व्याजदर जाहीर केले. या व्याजदरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.(schemes)त्यामुळे पोस्ट ऑफिसर फिक्स्ड डिपॉझिट, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट, पब्लिक प्रोव्हिडंट फंडवरील व्याज सारखे आहे. यामधील गुंतवणूक ही कधीही फायद्याची असते. तसेच या योजनांमध्ये गुंतवणूकीवर चांगला परतावा तर मिळतोच परंतु टॅक्स बेनिफिटदेखील मिळते.वित्तीय एक्सपर्टच्या म्हणण्यांनुसार, रेपो रेटमध्ये कपात झाल्यावर बँकांच्या योजनांवर मिळणार व्याजदरदेखील कमी होत आहेत. या योजनांवर सध्या व्याजदर स्थिर आहेत. परंतु हे कमी होऊ शकते. या योजनांमध्ये गुंतवणूक केल्यावर तुम्हाला कलम80C अंतर्गत सूट मिळते. तुम्हाला १.५ लाखांवर कोणताही टॅक्स भरावा लागत नाही.

नॅशनल सेव्हिंग टाइम डिपॉझिट योजनेत तुम्हाला ७.५ टक्के व्याज मिळते. या योजनेत तुम्ही कमीत कमी १००० रुपयांची गुंतवणूक करु शकतात. जास्तीत जास्त कितीही रक्कम गुंतवू शकतात.या योजनेत तुम्हाला ८.२ टक्के व्याजदर मिळते. या योजनेत ६० वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील नागरिकांना व्याजदर मिळते.(schemes) या योजनेत तुम्हाला टॅक्स बेनिफिटदेखील मिळतात.

पीपीएफ ही गुंतवणूकीसाठी आणि टॅक्स वाचवण्यासाठी बेस्ट आहे. या योजनेत तुम्हाला वर्षाला कमीत कमी ५०० आणि जास्तीत जास्त १.५ लाख रुपये गुंतवावे लागतील. यावर ७.१ टक्के व्याजदर मिळते. याची मॅच्युरिटी १५ वर्षांची आहे.सुकन्या समृद्धी योजनेत ८.२ टक्के व्याजदर मिळते. (schemes)या योजनेत १० वर्ष किंवा त्यापेक्षा कमी वयोगटातील मुलींच्या नावाने अकाउंट ओपन करु शकतात. या योजनेत वर्षाला २५० ते १.५ लाख रुपये गुंतवू शकतात. या योजनेतील पैसे तुम्ही लेकीच्या लग्नासाठी किंवा शिक्षणासाठी वापरु शकतात.

हेही वाचा :