संत प्रेमानंद महाराज किडनीच्या समस्यांनी हैराण झालं आहेत.(sermons)सोशल मीडियावर प्रेमानंद महाराज आणि त्यांची प्रवचन खूप लोकप्रिय आहेत. प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी उत्तर प्रदेशातील मथुरा येथील वृंदावन येथील संत प्रेमानंद जी महाराजांच्या आश्रमात गेली होती. यावेळी शिल्पा शेट्टीसोबत तिचे पती राज कुंद्रासोबत आश्रमात आली होती. यादरम्यान राज कुंद्राने संत प्रेमानंद महाराजांसमोर असा प्रस्ताव ठेवला जो ऐकून सगळ्यांनाच धक्का बसला. शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांनी प्रेमानंद महाराजांची भेट घेतली आणि त्यांचे आशीर्वाद घेतले. बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा तिचा पती स्टार क्रिकेटर विराट कोहलीदेखील संत प्रेमानंद यांच्या आश्रमात येतात, ज्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

राज कुंद्राने दिला खास प्रस्ताव आश्रमात भेटीनंतर शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांनी खाजगीत विशेष संवाद साधला. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, (sermons) या चर्चेंदरम्यान राज कुंद्राने संत प्रेमानंद महाराजांना त्याची किडनी दान करण्याची इच्छा व्यक्त केली. महाराज मला तुम्हाला माझी किडनी दान करायची आहे. काय म्हणाले प्रेमानंद महाराज? संत प्रेमानंद महाराजांनी राज कुंद्राचा हा प्रस्ताव नम्रपणे नाकारला. त्यांना आशीर्वाद देताना ते म्हणाले की तुम्ही निरोगी राहा, हा माझ्यासाठी सर्वात मोठा आशीर्वाद आहे. याआधीही अनेकांनी संत प्रेमानंद महाराजांना किडनी दान करण्याची इच्छा व्यक्त केली होती. संत प्रेमानंद या प्रस्तावांना नकार देत आहेत. प्रेमानंद महाराज म्हणाले की देवाने दिलेले श्वास पुरेसे आहेत.

वृंदावनात चाहत्यांची गर्दी जमली शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा वृंदावनात पोहोचल्याची बातमी कळताच सर्वत्र एकच खळबळ उडाली. त्यांची एक झलक पाहण्यासाठी आश्रमाभोवती मोठ्या संख्येने चाहते आणि इतर भक्त पोहोचले.(sermons)मंदिर परिसरातही उपस्थित असलेल्या लोकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. यादरम्यान चाहत्यांनी शिल्पा शेट्टीचे खूप उत्साहाने स्वागत केले. राज कुंद्रा काय म्हणाले शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्याबद्दल सतत बातम्या येत आहेत. चुकीच्या चित्रपटांशी त्यांचे नाव जोडल्यानंतर त्यांना तुरुंगात जावे लागले. त्या काळात शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राचे मार्ग वेगळे होत असल्याचे दिसत होते. त्यावेळी शिल्पा शेट्टीने राज कुंद्राला तिचा पती म्हणून स्वीकारण्यास नकार दिला होता. तिने नाते तोडण्याबाबतचे विधानही दिले होते. मात्रा आता दोघेही प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात एकत्र दिसू लागले होते.

हेही वाचा :

शेतकऱ्यांचा बुधगावात मेळावा; राजू शेट्टी, सतेज पाटील राहणार उपस्थित
“130 किमी रेंजसह दमदार इलेक्ट्रिक स्कूटर; फक्त ₹81,000 मध्ये विक्रीला
जगातील सर्वात भयानक शापित गाव, इथे जाताच लोकांच्या बनतात बाहुल्या

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *