सर्व्हर डाऊन, इंटरनेटही बंद; अकरावीची प्रवेश प्रक्रिया अडचणीत, विद्यार्थी चिंतेत

राज्यातील अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या संकेतस्थळावर दोन दिवस (admission) तांत्रिक बिघाड झाल्याने विद्यार्थ्यांची मोठी तारांबळ उडाली. या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने अर्जाचा भाग दोन आणि महाविद्यालयांचा प्रधान क्रमांक भरण्यासाठी आता 25 मे पर्यंत मुदत वाढ दिली आहे.सलग दोन दिवस आम्ही ऑनलाइन फॉर्म भरण्याचा प्रयत्न केल्या मात्र फॉर्म भरता आला नाही याचा मनस्ताप झाला आज मात्र सर्व्हर व्यवस्थित सुरू आहे, आम्हाला फॉर्म भरता आला प्रतिक्रिया विद्यार्थी यांनी दिली.

दुसरीकडे नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा, धडगाव तालुक्यात इंटरनेट (admission) सेवेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, नागरिकांना दैनंदिन कामकाजासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.सध्या शाळा आणि महाविद्यालयांच्या प्रवेश प्रक्रिया सुरू असताना तसेच शासनाच्या बहुतांश योजना ऑनलाइन पद्धतीने सुरू असल्यामुळे इंटरनेट अभावी नागरिकांचे हाल होत आहेत. अनेक नागरिकांना कामासाठी अनेक किलोमीटरचा प्रवास करून तालुक्याच्या ठिकाणी जावं लागत आहे, मात्र तिथेही समाधानकारक सेवा मिळत नसल्याची तक्रार आहे.

नेटवर्कच्या समस्येमुळे ऑनलाइन व्यवहार, शासकीय योजनांचे अर्ज,(admission) विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण आणि इतर महत्त्वाची कामे ठप्प होत आहेत. मोबाईलमध्ये नेटवर्क दिसत असलं तरी इंटरनेट सेवा व्यवस्थित सुरू नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासन आणि संबंधित कंपन्यांनी या समस्येकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी आता नागरिकांकडून केली जात आहे.

हेही वाचा

शरद पवार भाकरी फिरवणार, 22-23 आमदार संपर्कात? नेमकं काय घडतयं?

पेट्रोलबाबत सरकारचा मोठा निर्णय; जाणून घ्या काय असतील फायदे?

वडिलांच्या समोर कोल्हापुरातील राजाराम बंधाऱ्यावर १२ वर्षीय मुलगा बुडाला