पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे देशातील सर्वसामान्य (cheaper) नागरिकांमध्ये महागाईची चिंता वाढू लागली आहे. गेल्या 8 दिवसांत दिवसांत पेट्रोल-डिझेल 3 वेळा महागल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला आता मोठी झाल बसणार आहे.तेल कंपन्यांनी या दरवाढीमागे विविध कारणे सांगितली जात आहेत. पेट्रोलियम क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, कंपन्यांना सध्या मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. त्यामुळे भविष्यात इंधनाचे दर आणखी वाढू शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे.मात्र आता याच पार्श्वभूमीवर एक महत्त्वाचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. तो म्हणजे पेट्रोल आणि डिझेलला जर GST च्या कक्षेत आणले तर सामान्य नागरिकांना काय फायदा होईल?

सध्या भारतात पेट्रोल आणि डिझेलवर केंद्र सरकारकडून एक्साइज ड्युटी (cheaper) आणि राज्य सरकारांकडून व्हॅट लावला जातो. याशिवाय डीलर कमिशनही जोडले जाते. या सर्व गोष्टी मिळून इंधनाची अंतिम किंमत मोठ्या प्रमाणात वाढते.उदाहरणार्थ, दिल्लीत पेट्रोलची मूळ किंमत सुमारे 66 रुपये प्रति लिटर आहे. यात -केंद्र सरकारकडून 7.80 रुपये एक्साइज ड्युटी आकारली जाते.राज्य सरकारकडून 13.39 रुपये व्हॅट लावला जातो.याशिवाय डीलर्सना 3.03 रुपये प्रति लिटर कमिशन दिले जाते. त्यामुळे हे सर्व मिळून डिझेलची अंतिम किंमत सुमारे 92.49 रुपये प्रति लिटर इतकी होते.यावरून स्पष्ट होते की डिझेलच्या दरात मोठा हिस्सा करांचा असतो. त्यामुळे रिफायनरीमधून तुलनेने कमी दरात बाहेर पडणारे डिझेल बाजारात पोहोचेपर्यंत खूप महाग होते.
सध्या पेट्रोलवर सुमारे 40 टक्क्यांहून अधिक आणि डिझेलवर सुमारे 30 टक्क्यांहून (cheaper)अधिक कराचा बहार आहे.याच पार्श्वभूमीवर पेट्रोलियम उत्पादनांना GST मध्ये आणण्याची मागणीही वाढत आहे. व्यापारी संघटनांचे म्हणणे आहे की यामुळे कर रचना अधिक सोपी होऊ शकते.जर पेट्रोलला 18% GST च्या कक्षेत आणले गेले, तर त्याची किंमत कमी होऊ शकते. उदाहरणार्थ, दिल्लीमध्ये पेट्रोलची मूळ किंमत 66.29 रुपये प्रति लिटर आहे. त्यावर 18% GST लावल्यास 11.93 रुपये कर होतो. म्हणजेच अंतिम किंमत सुमारे 78.22 रुपये प्रति लिटर इतकी होऊ शकते. म्हणजेच तब्बल 15 रुपये स्वस्त होऊ शकते.तज्ज्ञांच्या मते, GST लागू झाल्यास इंधन दरांमध्ये स्थिरता येऊ शकते, मात्र याबाबत अंतिम निर्णय अजून झालेला नाही.
हेही वाचा
शरद पवार भाकरी फिरवणार, 22-23 आमदार संपर्कात? नेमकं काय घडतयं?
पेट्रोलबाबत सरकारचा मोठा निर्णय; जाणून घ्या काय असतील फायदे?
वडिलांच्या समोर कोल्हापुरातील राजाराम बंधाऱ्यावर १२ वर्षीय मुलगा बुडाला