डोनाल्ड ट्रम्पच्या मुलीवर प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कुटुंबाला लक्ष्य करणाऱ्या एका (attack) आंतरराष्ट्रीय दहशतवादी कटाचा अमेरिकन सुरक्षा यंत्रणांनी पर्दाफाश केला आहे. ट्रम्प यांची कन्या इव्हांका ट्रम्प यांच्या हत्येचा अत्यंत गंभीर आणि पद्धतशीर कट रचणाऱ्या एका इराणी गुप्तचर नेटवर्कशी संबंधित दहशतवाद्याला सुरक्षा दलांनी अटक केली आहे. या संपूर्ण कटामागे इराणची लढाऊ यंत्रणा ‘इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स’चा थेट हात असल्याचा अधिकृत आरोप अमेरिकेने केला आहे.अमेरिकेच्या केंद्रीय तपास यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपीला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी करण्यात आली. या चौकशी दरम्यान त्याने अत्यंत धक्कादायक खुलासे केले आहेत. साधारण सहा वर्षांपूर्वी अमेरिकेने केलेल्या एका क्षेपणास्त्र ड्रोन हल्ल्यात इराणचे तत्कालीन लष्करी कमांडर जनरल कासिम सुलेमानी मारले गेले होते. या सुलेमानी यांच्या मृत्यूचा सूड उगवण्यासाठीच ट्रम्प कुटुंबातील सदस्याची हत्या करण्याचे उद्दिष्ट त्याने निश्चित केले होते. हा आरोपी इराणी लष्करी तळावर विशेष प्रशिक्षण घेऊन अमेरिकेत दाखल झाला होता.

तपास यंत्रणांनी जाहीर केलेल्या तपशिलानुसार, अटक करण्यात आलेल्या ३२ वर्षीय (attack) संशयिताचे नाव मोहम्मद बाकेर साद दाऊद अल-सादी असे असून तो मूळचा इराकचा रहिवासी आहे. तो कासिम सुलेमानी यांना आपला आदर्श मानत होता आणि त्यांच्या मृत्यूनंतर तो सातत्याने ट्रम्प कुटुंबाला हानी पोहोचवण्याच्या प्रयत्नात होता. गुप्तचर विभागाच्या अहवालानुसार, अल-सादी हा एकटा या मोहिमेवर नव्हता, तर त्याला इराण सरकार आणि इराणी लष्कराकडून मोठ्या प्रमाणावर आर्थिक व तांत्रिक मदत पुरवण्यात आली होती

तपास मोहिमेदरम्यान अमेरिकन सुरक्षा दलांनी अल-सादीच्या (attack) लपण्याच्या ठिकाणाहून इव्हांका ट्रम्प यांच्या फ्लोरिडा येथील आलिशान निवासस्थानाचे अत्यंत गुंतागुंतीचे अंतर्गत नकाशे आणि आराखडे जप्त केले आहेत. तो काही काळापासून त्या परिसरात वास्तव्य करून इव्हांका यांच्या दैनंदिन हालचालींवर आणि सुरक्षा व्यवस्थेवर पाळत ठेवून होता. मात्र त्याच्या संशयास्पद हालचालींमुळे अमेरिकेच्या गुप्तचर विभागाला त्याचा सुगावा लागला आणि कोणताही अनर्थ घडण्यापूर्वीच त्याला अटक करण्यात आली.

हेही वाचा

शरद पवार भाकरी फिरवणार, 22-23 आमदार संपर्कात? नेमकं काय घडतयं?

पेट्रोलबाबत सरकारचा मोठा निर्णय; जाणून घ्या काय असतील फायदे?

वडिलांच्या समोर कोल्हापुरातील राजाराम बंधाऱ्यावर १२ वर्षीय मुलगा बुडाला