२ गटातील तुंबळ हाणामारीत मुलाच्या डोक्यात दगड, दिवसाढवळ्या रस्त्यावर रक्तरंजित थरार

नाशिक : कामटवाडे परिसरात सोमवारी दुपारी घडलेल्या एका अत्यंत धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण शहर हादरले आहे. दोन गटांमध्ये झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर एक विधीसंघर्षग्रस्त बालक किरण चौरे याची डोक्यात दगड(stone) घालून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

प्राथमिक माहितीनुसार, कामटवाडे भागात दोन गटांमध्ये काही कारणांवरून वाद सुरू होता. वादाचा निकाल रक्तरंजित झाला आणि या वादात किरण चौरे याच्या डोक्यावर मोठ्या दगडाने(stone) वार करण्यात आला. यानंतर त्याला जबर मारहाणही करण्यात आली. गंभीर जखमी झालेल्या किरणचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

हत्या केल्यानंतर आरोपी तात्काळ फरार झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच अंबड पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून, पंचनामा करून अधिक तपास सुरू करण्यात आला आहे. पोलीस आरोपींचा शोध घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत असून, फरार आरोपींच्या अटकेसाठी विशेष पथकही तयार करण्यात आले आहे.

आरोपी हा सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तरीही या हत्येमागचं नेमकं कारण काय? वाद कोणत्या कारणावरून झाला? याचा तपास सध्या पोलिसांकडून सुरू आहे.

या भीषण घटनेनंतर कामटवाडे परिसरात भीतीचं वातावरण पसरले आहे. पोलिसांनी परिसरात चोख बंदोबस्त तैनात केला असून, नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.

हेही वाचा :

मुख्यमंत्र्यांचा मास्टरस्ट्रोक! शासकीय GR संदर्भात घेतला सर्वात मोठा निर्णय

‘माझा मुलगा तुमच्या…’, अंगदची खिल्ली उडवणाऱ्या ट्रोलर्सवर बुमराची पत्नी भडकली

रोज तुम्ही मृत्यूला कवटाळताय, ‘रेडी टू ईट’ पदार्थांनी पोखरतंय शरीर; वेळीच व्हा सतर्क