जीममध्ये व्यायाम करतानाच काही सेकंदात गेला जीव; सीसीटीव्ही फुटेज व्हायरल

संभाजीनगर : संभाजीनगरमध्ये ह्रद्यद्रावक घटना घडली आहे. एका व्यक्तीचा जिम(footage) करतानाच मृत्यू झाला आहे. अवघ्या काही सेकंदामध्ये या व्यक्तीचा मृत्यू झाला. जिममध्ये मृत्यूमुखी पडलेला हा व्यक्ती संभाजीनगरमधील एक उद्योजक आहेत. हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. सोशल मीडियावर जिममधील या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. नेटकऱ्यांनी देखील शोक व्यक्त केला आहे.

तुम्ही जिममध्ये कोणत्याही सूचनांशिवाय चूकीचा व्यायाम(footage) करत असाल तर सावधान रहा. व्यायाम करताना मृत्यू होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. याचे मुख्य कारण हृदयविकाराचा झटका ठरत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या सीसीटीव्ही फूटेजमध्ये संभाजीनगरमधील अशीच घटना कैद झाली आहे. यामध्ये मृत्यू झालेल्या उद्योजक सिमरन मोटरचे मालक कवलजीत सिंग बग्गा आहेत.

कवलजीत सिंग बग्गा हे दररोजप्रमाणे आपल्या सहकाऱ्यांसोबत व्यायाम करत आहेत. यावेळी त्यांचा तोल गेला आणि ते भिंतीवर धडकले. अवघ्या काही सेकंदामध्ये त्यांचा मृत्यू झाला. अनेकांनी त्यांना सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.

जीममध्ये घटना घडल्यानंतर कवलजीत सिंग यांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. अवघ्या काही सेकंदात मृत्यूने गाठल्याने अनेक नेटकऱ्यांनी शोक व्यक्त केला आहे. यापूर्वी देखील अनेकांचा जीममध्ये व्यायाम करताना मृत्यू झाला आहे. यामध्ये कॉमेडियन राजू श्रीवास्तव, कन्नड चित्रपट अभिनेता पुनीत राजकुमार आणि अभिनेता सिद्धार्थ शुक्ला यांची नावे समोर येतात. त्यामुळे जीम करताना योग्य पद्धतीने आणि सल्ल्याने व्यायाम करणे अतिशय महत्त्वाचे आहे.

हेही वाचा :

शिळ्या चपातीपासून झटपट तयार करा स्वादिष्ट स्नॅक्स; जाणून घ्या रेसिपी

इचलकरंजीत पाणी नागरी वस्तीच्या दिशेने; शहरातील जुना पूल वाहतुकीस बंद

कधीपर्यंत साहेबांच्या मृत्यूचं राजकारण करणार धर्मवीर २ वरून केदार दिघेचा शिंदेंना सवाल