तब्बल 20 वर्षांनंतर मिटलं इमरान हाश्मी-मल्लिका शेरावतचं भांडण

चित्रपट निर्माते आनंद पंडित यांच्या मुलीच्या रिसेप्शन पार्टीचे(ufc fights) आयोजन काल (11 एप्रिल) करण्यात आलं होतं. या पार्टीला बॉलिवूडमधील प्रसिद्ध कलाकारांनी हजेरी लावली. आनंद पंडित यांच्या मुलीच्या रिसेप्शन पार्टीमधील अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले.ज्यामध्ये सेलिब्रिटी हे रेड कार्पेटवर पापाराझीला पोज देताना दिसले.

आनंद पंडित यांची मुलगी ऐशच्या लग्नाच्या रिसेप्शनला(ufc fights) शाहरुख खाननं खास लूकमध्ये हजेरी लावली. शाहरुख हा यावेळी ऑल ब्लॅक लूकमध्ये दिसला. काळा कोट-पँट आणि बूट अशा डॅशिंग लूकमध्ये शाहरुख स्पॉट झाला होता.

गेल्या काही दिवसांपासून तापसी पन्नूच्या लग्नाची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. तापसीच्या ‘सिक्रेट वेडिंग’चे बरेच फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. अशातच लग्नाच्या चर्चेदरम्यान तापसी ही आनंद पंडित यांच्या मुलीच्या रिसेप्शन सोहळ्यामध्ये स्पॉट झाली. या रिसेप्शन सोहळ्यासाठी तापसी पन्नूनं खास लूक केला होता. लाल साडी, केसांमध्ये गजरा आणि स्टोनचे इअरिंग्स अशा लूकमध्ये तापसीनं रिसेप्शन सोहळ्याला हजेरी लावली.

‘मर्डर’ हा चित्रपट 2004 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील इम्रान हाश्मी आणि मल्लिका शेरावत यांच्या केमिस्ट्रीनं प्रेक्षकांची मनं जिंकली. अशातच आता इम्रान आणि मल्लिका हे प्रेक्षकांना पुन्हा एकदा एकत्र दिसले. आनंद पंडित यांच्या मुलीच्या रिसेप्शन पार्टीत इम्रान आणि मल्लिका यांनी पापाराझीला एकत्र पोज दिली.

मोठ्या पडद्यावर हिट जोडी बनल्यानंतर इमरान हाश्मीने मल्लिका शेरावतबद्दल मोठं वक्तव्य केलं होतं. करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये इमरानने मल्लिकाला ‘वाईट किसर’ म्हटलं होतं. आता तब्बल 20 वर्षांनंतर ही लोकप्रिय जोडी एकत्र दिसली. 2004 मध्ये प्रदर्शित झालेला ‘मर्डर’ हा चित्रपट अनेकांना माहित असेल. या चित्रपटातील मल्लिका शेरावत आणि इमरान हाश्मी यांची जोडी खूप हिट झाली होती. या दोघांमधील इंटिमेट सीन्स चर्चेचा विषय ठरले होते.

इमरान आणि मल्लिकाची ऑनस्क्रीन केमिस्ट्री चांगलीच गाजली होती. असं असूनही नंतर या दोघांनी एकत्र काम केलंच नाही. आता तब्बल 20 वर्षांनंतर या लोकप्रिय जोडीला एकत्र पाहिलं गेलंय. निर्माते आनंद पंडित यांच्या मुलीच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये मल्लिका आणि इमरानला पाहिलं गेलं. या दोघांना एकत्र पाहून चाहत्यांनीही आनंद व्यक्त केला.

इमरान हाश्मीने यावेळी काळ्या रंगाचा सूट तर मल्लिका शेरावतने गुलाबी रंगाचा गाऊन परिधान केला होता. हे दोघं जेव्हा समोरासमोर आले, तेव्हा सर्व कॅमेरे त्यांच्याकडे फिरले. दोघांनी एकमेकांची विचारपूस केली आणि मिठीसुद्धा मारली. त्यानंतर पापाराझींनी त्यांना एकत्र फोटोसाठी विनंती केली. तेव्हा इमरान आणि मल्लिका यांनी पापाराझींसमोर फोटोसाठी एकत्र पोझ दिले. इमरान आणि मल्लिकाचे फोटो, व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. त्यावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. या दोघांनी पुन्हा एकत्र काम करावं, अशी इच्छा अनेकांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा :

कहरच! बाजारात विक्रीला आणलेले गाजर पायाने धुतले

कोल्हेंचा डबल धमाका; सकाळी पाचुंदकरांची घरवापसी, संध्याकाळी देशमुखांचा प्रवेश

किंग खान अन् भाईजानची झलक पाहण्यासाठी अलोट गर्दी, चाहत्यांना पांगवण्यासाठी पोलिसांचा लाठीचार्ज, Video Viral