महायुतीनंतर आता महाविकास आघाडीत ‘या’ मुद्यावरून बिघाडी; ठाकरेंना काँग्रेस देणार झटका?

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा(political updates) दारूण पराभव झाला. 50 जागाही या तिन्ही पक्षांना जिंकता आल्या नाहीत. त्यानंतर या महविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये मतभेद असल्याचे वेळोवेळी पाहिला मिळाले. तरीही वरवर आघाडी टिकून आहे. मात्र, विधान परिषदेमधील विरोधी पक्षनेतेपदावरून काँग्रेस आणि शिवसेना (उबाठा) पक्षांमध्ये मतभेद उफाळण्याची शक्यता आहे.

सध्या उद्धव ठाकरे गटाचे (political updates)अंबादास दानवे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आहेत. परंतु, त्यांची मुदत येत्या ऑगस्टमध्ये संपत आहे. त्यामुळे या पदावर दावा करण्याची काँग्रेसने तयारी सुरू केल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. सध्या काँग्रेसकडे विधान परिषदेत सर्वाधिक आठ सदस्य आहेत, तर ठाकरे गटाकडे सात आणि शरद पवार गटाकडे दोन सदस्य आहेत. त्यामुळे संख्याबळाच्या आधारे काँग्रेसने हे पद मागितले आहे.

विधानसभेत महाविकास आघाडीतील सर्वाधिक आमदार शिवसेना (उबाठा) पक्षाकडे आहेत. ठाकरे गटाचे 20, काँग्रेसचे 16 आणि शरद पवार गटाचे 10 आमदार आहेत. त्यामुळे विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद उद्धव ठाकरेंच्या पक्षाला मिळू शकते, असा अंदाज आहे. जर विधानसभेत ठाकरे गटाला विरोधी पक्षनेते पद मिळाले, तर विधान परिषदेमध्ये काँग्रेसने हे पद मागणे स्वाभाविक असल्याचा काँग्रेसचा युक्तिवाद आहे.

विरोधी पक्षनेते पदावरुन ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये चर्चेचे सत्र सुरू असल्याची माहिती मिळत आहे. यावर अंतिम निर्णय अजून झालेला नाही. मात्र, काँग्रेसने ठाम भूमिका घेतल्यास महाविकास आघाडीतील तणाव वाढू शकतो.

३० सदस्य हे विधानसभा सदस्यांमार्फत निवडले जातात. २२ सदस्य विविध स्थानिक प्राधिकरणांमार्फत निवडले जातात. ७ सदस्य पदवीधर मतदारसंघांमधून निवडून येतात. ७ सदस्य शिक्षक मतदारसंघांमधून निवडले जातात. १२ सदस्यांची नियुक्त्ती राज्यपालांकडून केली जाते.

हेही वाचा :

हॉटेलच्या रूममध्ये कॅमेरा लपवलेला असेल का स्मार्टफोनच्या मदतीने असं ओळखा

टॉयलेटमधील नळाच्या पाण्यात बनवला स्वयंपाक नेटकऱ्यांमध्ये संतापाची लाट Video Viral

१ एप्रिलपासून सर्व वाहनांसाठी फास्टॅग अनिवार्य; अन्यथा भरावा लागेल दुप्पट टोल