उड्डाण घेताच एअर इंडियाच्या विमानाला आग;

उड्डाणाच्या १० मिनिटांनंतर या विमानाच्या इंजिनने पेट घेतला. त्यामुळे विमानाचे (aeroplane)आपातकालीन लॅंडिग करण्यात आले. तसेच १७९ प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात आले.

पुण्याहून कोच्चीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला उड्डाणानंतर १० मिनिटांनी आग लागल्याची धक्कादायक घडना घडली आहे. शनिवारी सायंकाळी बंगळुरू विमानतळावरून या विमानाने उड्डाण घेतल्यानंतर ही घटना घडली. त्यानंतर विमानाचे आपातकालीन लॅंडिंग करण्यात आले. या विमानात एकूण सहा क्रू मेंबरसह १७९ प्रवासी होते.

पुण्याहून कोच्चीला जाणारे एअर इंडियाचे विमान IX-1132 पुण्याहून निघाल्यानंतर शनिवारी सांयकाळी बंगळुरू विमान तळावर पोहोचले. नियोजित कार्यक्रमानुसार हे विमान काही तासांसाठी बंगळुरू विमानतळावर थांबणार होते. त्यानंतर या विमानाने कोच्चीला जाण्यासाठी पुन्हा उडाण घेतले. मात्र, उड्डाणाच्या १० मिनिटांनंतर या विमानाच्या इंजिनने पेट घेतला. त्यामुळे विमानाचे आपातकालीन लॅंडिग करण्यात आले. तसेच १७९ प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात आले.

महत्त्वाचे म्हणजे मागील काही दिवसांत एअर इंडियाच्या विमानाला आग लागण्याची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी १७ मे रोजी दिल्लीहून बंगळुरूला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातील पॉवर युनिटकडून आगीचा इशारा मिळाल्यानंतर विमानाचे आपातकालीन लॅंडिंग करण्यात आले होते. या विमानातही जवळपास १७५ प्रवासी होते.

बंगळुरूतील घटनेबाबत बोलताना एअर इंडियाचे प्रवक्ते म्हणाले, “पुण्याहून कोच्चीला जाण्यासाठी निघालेल्या विमान काही तासांसाठी बंगळुरु विमानतळावर थांबले होते. त्यानंतर हे विमानाने कोच्चीला जाण्यासाठी पुन्हा उड्डण घेतल्यानंतर १० मिनिटांनी या विमानाच्या इंजिनला आग लागली. त्यानंतर विमानाचे आपातकालीन लॅंडिंग करण्यात आले. तसेच सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. शॉट सर्किटमुळे ही आग लागली असावी असा अंदाज आहे. मात्र, या प्रकरणाचा तपास सुरू आहे.”

हेही वाचा :

मुख्यमंत्र्यांच्या भावालाच नाही करता आले मतदान

कबरीतून मृतदेह उकरून 15 किमी बाईकवरून आणला, मग किचनमध्ये पेटवला

‘रावण पण हिंदुत्ववादी’, मतदानाच्या दिवशी राज ठाकरेंवर खूप बोचरी टीका