लोकसभा निकालापूर्वी अजित पवारांचा मोठा विजय! विधानसभेवर फडकला झेंडा

अरुणाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीची मतमोजणी कडेकोट बंदोबस्तात(flag) सकाळी ६ वाजता सुरू झाली होती. विधानसभेच्या 60 जागांपैकी भाजपने आधीच 10 जागा बिनविरोध जिंकल्या आहेत आणि 19 एप्रिल रोजी 50 जागांवर मतदान झाले होते. या निवडणुकीत भाजपला बहुमत मिळाले आहे तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने जलवा केला आहे.

एकूण 133 उमेदवारांच्या भवितव्याचा(flag) फैसला आज झाला. मतमोजणी सुरू झाल्यापासून भाजपला आघाडी मिळत होती. दरम्यान अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला एका जागेवर विजय मिळला आहे. दोन जागांवर आघाडीवर आहे. याचुली मतदारसंघात टोको तातुंग यांनी २२८ मतांनी विजय मिळवला. त्यांना टोटल मतदान ८ हजार २५५ झालं.

विधानसभेच्या 60 जागा असलेल्या अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपला बहुमत मिळाले आहे. त्याचवेळी, 32 जागांच्या सिक्कीम विधानसभेत सत्ताधारी सिक्कीम क्रांतीकारी मोर्चा (SKM) क्लीन स्वीपकडे वाटचाल करत आहे. या दोन्ही राज्यांमध्ये 19 एप्रिल रोजी मतदान झाले होते. सिक्कीममध्ये एकूण 79.88 टक्के मतदान झाले, तर अरुणाचल प्रदेशमध्ये 82.95 टक्के मतदान झाले.

60 जागांच्या अरुणाचल विधानसभेत सत्ताधारी भाजप आणि काँग्रेसमध्ये लढत आहे. भाजपने सर्व 60 जागांवर उमेदवार उभे केले, तर काँग्रेसने केवळ 19 जागा लढवल्या. अरुणाचल प्रदेशमध्ये नॅशनल पीपल्स पार्टी (एनपीपी) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (एनसीपी) यांनीही उमेदवार उभे केले आहेत.

हेही वाचा :

खळबळजनक! भाजप कार्यकर्त्याची गोळ्या झाडून हत्या

ठाकरे- पवार इज बॅक… आता बंडखोर काय करणार?; विधानसभेपूर्वी राज्यात मोठ्या घडामोडी?

मोदींसारख्या तपस्वी, ध्यानस्थ अन् ध्यानमग्न माणसाला 800 जागा मिळाल्या पाहिजेत…