‘9 वर्षे हे सगळं सुरू…’ , गोविंदाचा ‘त्या’ गोष्टीबद्दल गौप्यस्फोट!

बॉलिवूड अभिनेता(actor) गोविंदा आपल्या उत्कृष्ट अभिनय आणि जबरदस्त कॉमिक टायमिंगसाठी प्रसिद्ध आहे. मात्र, त्याच्या कारकिर्दीत अनेक वाद देखील झाले आहेत. 2008 मध्ये ‘मनी है तो हनी है’ या चित्रपटाच्या सेटवर त्याने संतोष नावाच्या व्यक्तीला चापट मारली होती. या प्रकरणावर 9 वर्षे कोर्टात सुनावणी झाली आणि शेवटी 2017 मध्ये सुप्रीम कोर्टाने हा वाद निकाली काढला.

या घटनेनंतर संतोषने गोविंदा विरोधात कोर्टात तक्रार दाखल केली आणि त्याने नुकसान भरपाई म्हणून मोठी रक्कम मागितली. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत गोविंदाने या प्रकरणावर खुलासा केला. अभिनेता(actor) मुकेश खन्ना यांच्या पॉडकास्टमध्ये बोलताना गोविंदा म्हणाला, “या चापट प्रकरणाने मला नशीबवान बनवले. सेटवर एक व्यक्ती गैरवर्तन करत होता आणि मी त्याला चापट मारली. हे सगळं 9 वर्षे सुरू होता, पण एका मित्राने मला त्या व्यक्तीचे स्टिंग ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला.”
गोविंदाने सांगितले की, संतोष त्याच्याकडून 3-4 कोटी रुपये मागत होता आणि केस मागे घेण्याच्या बदल्यात पैसे देण्याचा सौदा करण्यास तयार होता. गोविंदाने हा संवाद रेकॉर्ड करून न्यायालयात सादर केला. त्याच वेळी, त्याने सांगितले की, संतोषने सेटवर काही महिलांसोबतही गैरवर्तन केले होते, मात्र त्या महिलांनी कोर्टात त्याच्या बाजूने साक्ष द्यायला नकार दिला.
शेवटी 2017 मध्ये सुप्रीम कोर्टाने गोविंदाला संतोषची माफी मागायला सांगितली, तर संतोषने नुकसानभरपाई मागण्याचा निर्णय मागे घेतला आणि हा वाद संपला.
गोविंदाच्या वैयक्तिक आयुष्यात नवा पेच-
गोविंदाने ‘स्वर्ग’, ‘हद कर दी आपने’, ‘दीवाना मस्ताना’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर त्याच्या पत्नी सुनिता आहुजा सोबत विभक्त होण्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. दोघांनी 37 वर्षे एकत्र घालवली असून त्यांना दोन मुले – टीना आणि यशवर्धन आहेत.
हेही वाचा :
काय सांगता? राज अन् उद्धव गुढीपाडव्याला एकत्र…
पत्नीच्या शरिराचे केले २०० तुकडे अन्…, पीडितेच्या कुटुंबाने केली धक्कादायक मागणी
अजितदादांचा काँग्रेसला सर्वात मोठा धक्का; दोन बडे नेते राष्ट्रवादीत?