80 वर्षांच्या वृद्धाला गाडीत कोंडून ठेवलं आणि कुटुंब ताजमहाल बघायला गेलं, पुढे जे झालं…व्हिडिओ समोर

उत्तर प्रदेश : जगभरात प्रेमाचं प्रतिक म्हणून प्रसिद्ध असलेल्या ताजमहाल(Taj Mahal) परिसरात एक धक्कादायक घटना घडली. एक कुटुंब आपल्याच घरातील वृद्ध माणसासोबत अत्यंत अमानुषपणे वागले. वृद्ध व्यक्तीला मरणाच्या तोंडी देऊन स्वतः फिरत राहिले.

ताजमहालच्या पश्चिमेकडील प्रवेशद्वाराजवळ एका ८० वर्षांच्या वृद्धाला कारमध्ये बांधून ठेवल्याचे आढळले. त्यांचे कुटुंब ताजमहाल(Taj Mahal) बघायला गेले होते आणि वृद्ध माणूस कारमध्ये एकटाच होता. पार्किंग कर्मचाऱ्यांनी त्याला वाचवले.

पार्किंगमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी एका वृद्ध व्यक्तीला कारमध्ये गंभीर अवस्थेत पाहिले. दुपारच्या उष्णतेमुळे त्यांची तब्येत खालावली होती. कर्मचाऱ्यांनी तात्काळ गाडीची काच तोडून त्यांना बाहेर काढले. TOI नुसार, पोलिसांनी सांगितले की, कर्मचाऱ्यांनी त्यांना या घटनेची माहिती दिली.

पर्यटन पोलिस निरीक्षक कुंवर सिंग म्हणाले, “पार्किंगमध्ये काम करणारा एक कर्मचारी धावत आमच्याकडे आला. त्याने सांगितले की, एक वृद्ध व्यक्ती कारमध्ये बेशुद्ध अवस्थेत पडली आहे.” ज्या गाडीत वृद्ध व्यक्तीला डांबून ठेवण्यात आले होते त्या गाडीवर महाराष्ट्र राज्याची नंबर प्लेट होती.

त्या गाडीतील सहा लोक ताजमहाल(Taj Mahal) पाहण्यासाठी गेले होते. आणि वृद्ध माणसाला गाडीतच ठेवून गाडीचे दरवाजे बंद करुन गाडीतील एसीही बंद ठेवली होती. सफाई कर्मचाऱ्यांनी पोलिसांना माहिती देऊन गाडीच्या काचा फोडल्या. दरम्यान, पोलिसांनी तातडीने रुग्णवाहिकेला बोलावले.

वैद्यकीय पथक घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी वृद्ध माणसाची तपासणी करून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. पोलिस या प्रकरणाची अधिक चौकशी करत आहेत आणि कुटुंबाची माहिती गोळा करत आहेत. पोलिस घटनास्थळी पोहोचताच बघ्यांची खूप गर्दी झाली. लोकांनी व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. गोंधळ ऐकून वृद्ध व्यक्तीचे कुटुंब परत आले. त्यापैकी एकाने सांगितले, “ते (वृद्ध माणूस) माझे वडील आहेत.” त्यांनी वडिलांना परत गाडीत बसवले आणि ते लोक तिथून निघून गेले.

हेही वाचा :