‘कान्स चित्रपट महोत्सवात’ सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जिंकणारी ‘हि’ पहिली भारतीय

गेल्या काही दिवसांपासून कान्स चित्रपट महोत्सव(cannes film festival) सुरु आहे. या महोत्सवात विविध कलाकारांचा गौरव करण्यात येत आहे. अशातच आता कान्स चित्रपट महोत्सवात अभिनेत्री अनसूया सेनगुप्ता हिने अन सरटेन रिगार्ड सेगमेंटमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जिंकला आहे. अन सरटेन रिगार्ड सेगमेंटमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावणारी अनसूया ही पहिली भारतीय ठरली आहे. ‘शेमलेस’ या चित्रपटातील भूमिकेसाठी तिला या पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे.

‘शेमलेस’ या चित्रपटातील भूमिकेसाठी अनसूया सेनगुप्ताला पुरस्कार (cannes film festival)मिळाला आहे. एका पोलिसावर हल्ला केल्यानंतर दिल्लीतील वेश्यालयातून पळून जाणाऱ्या एका सेक्स वर्करचा प्रवास या चित्रपटात दाखवण्यात आला आहे.

अनूसया ही मुंबईत प्रॉडक्शन डिझायनर म्हणून ओळखले जाते आणि सध्या ती गोव्यात राहत आहे. ‘मसाबा मसाबा’ या नेटफ्लिक्स शोचा सेट डिझाइन करण्याचे काम तिनं केलं आहे. अनूसया ही मूळची कोलकाता येथील असून तिने तिचे शिक्षण जाधवपूर विद्यापीठात घेतले.

अनूसयाला पुरस्कार मिळाल्यानंतर अभिनेत्री तिलोत्तमा शोमने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली. यामध्ये तिनं लिहिलं, “खूप सुंदर! हा आनंद कसा व्यक्त करावा ते मला कळत नाही, माझ्याकडून अनूसयाला खूप शुभेच्छा.”

अनूसयासोबतच इतर काही कलाकारांच्या चित्रपटांचा देखील कान चित्रपट महोत्सवात गौरव करण्यात आला. गुआन दिग्दर्शित ‘ब्लॅक डॉग’ या चित्रपटाला कान्स चित्रपट महोत्सवातील अन सर्टेन रिगार्ड सेगमेंटमधील पारितोषिक देण्यात आले, तर बोरिस लॉजकीन ​​यांच्या ‘द स्टोरी ऑफ सॉलेमाने’ ला ज्युरी पारितोषिक मिळाले.

हेही वाचा :

ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी अन् हेल्थ फीचर्ससह सॅमसंग कंपनी करणार Galaxy Ring लाँच

तयारीला लागा ! लवकरच येणार आतापर्यंतचा सर्वांत मोठा आयपीओ

गुगलची भारतावर नजर! विस्तारासाठी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत