अनिल कपूर पुन्हा मु्ख्यमंत्री म्हणून दिसणार, नायक सिनेमाचा सिक्वेल येणार

अनिल कपूर पुन्हा मु्ख्यमंत्री(movie) म्हणून दिसणार, नायक सिनेमाचा सिक्वेल येणार2001 मध्ये ‘नायक’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. हा सिनेमा आजही तितकाच चर्चेत राहतो. या सिनेमाची कथा आजही अनेकांना आठवते.. या चित्रपटात राणी मुखर्जी, अनिल कपूर, पूजा बत्रा, अमरीश पुरी आणि जॉनी लीव्हर यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या.

अनिल कपूर यांनी मुख्यमंत्र्याची(movie) भूमिका सारकारली होती. एक मुख्यमंत्री कसा असावा यावर हा सिनेमा होता. या सिनेमातील त्यांची ही भूमिका अनेकांना आवडली होती. आज २३ वर्षांनंतर देखील नायकच्या कथेची चर्चा होते. पण आता या सिनेमाचा सिक्वेल येणार असल्याचं कळतं आहे. निर्माते या चित्रपटात कोणाला कास्ट करणार याचीही प्लॅनिंग सुरू झाली आहे.

एका न्यूज पोर्टलशी बोलताना सिनेमाचे निर्माता मुकुट यांनी ‘नायक-2’ चित्रपटाची माहिती दिलीये. ‘नायक-२’ प्रोजेक्टवर काम करत असून लवकरच त्याची घोषणा करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सध्या चित्रपटाच्या पटकथेवर काम सुरू आहे. चित्रपटात अभिनेते अनिल कपूर आणि राणी मुखर्जी यांना त्यांच्या भूमिकेत परत आणण्याची त्यांची योजना असल्याचं मुकुट यांनी सांगितले आहे.

ते म्हणाले की, “आम्ही सिक्वेलची योजना आखत आहोत. पात्र तिच असतील. पहिल्या सिनेमाच्या कथेवरच पुढची कथा तयारी केली जाणार आहे. मी निर्माता ए.एम. रत्नम यांच्याकडून त्याचे हक्क खूप पूर्वी विकत घेतले होते. आम्ही सध्या स्क्रिप्टवर काम करत आहोत आणि इतर कलाकारही या चित्रपटात असतील. कथा लिहिल्याबरोबरच बाकीच्या गोष्टीही दिसू लागतील, पण अजून काही ठरलेले नाही.

निर्माते मुकुट यांनी असेही सांगितले की सध्या तो सिक्वेलच्या संदर्भात सुरुवातीच्या टप्प्यात आहे, परंतु त्यांनी राणी मुखर्जी आणि अनिल कपूर यांच्याशी बोलणे सुरू केले आहे. नायकच्या सिक्वेलची कथा जिथून संपली तिथून सुरू होईल अशी माहिती आहे.

अमरीश पुरी यांचा खरा चेहरा पुढे आणल्यानंतर अनिल कपूर मुख्यमंत्रीपदी विराजमान होतात. यापुढेच ही कथा नेली जाऊ शकते. राणी मुखर्जी आणि अनिल कपूर यांनी या चित्रपटासाठी सहमती दर्शवली तर त्यांची जोडी 23 वर्षांनंतर एकत्र दिसणार आहे.

हेही वाचा :

धक्कादायक! मुंबईत धावत्या ट्रेनमध्ये मॉडेलवर अत्याचार

कलम 370 हटवणारा मोदी हाच संविधानाचा एकमेव रक्षक,

बुलढाणा :लोणारच्या दैत्यसुदन मंदिरात पाच दिवस सूर्यकिरणोत्सव