उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का; ‘हा’ बडा खासदार साथ सोडणार?

धाराशिव: राज्याच्या राजकीय(political updates) वर्तुळात सध्या ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा चांगलीच जोर धरू लागली आहे. ठाकरे गटाचे सहा खासदार फुटून शिंदे गटात जाणार असल्याचा दावा केला जात असून यात मुंबईतील एक खासदार आणि ग्रामीण भागातील पाच खासदारांचा समावेश असल्याचे बोलले जात आहे. यासाठी या खासदारांनी कायदेशीर बाबींची चर्चा करून ते अधिकृतरित्या शिंदे गटात प्रवेश करतील, अशीही चर्चा आहे.

धक्कादायक बाब म्हणजे फुटणाऱ्या खासदारांध्ये धाराशिवचे ठाकरे गटाचे खासदार(political updates) ओमराजे निंबाळकर यांच्याही नावाची चर्चा आहे. एकीकडे ठाकरे गटातील फूट चर्चेचा मुद्दा तापत असताना, या संभाव्य घडामोडींमुळे राज्यातील राजकीय वर्तुळात उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत.
हेही वाचा :
Google Chrome वापरकर्त्यांनो, सावधान! सरकारने दिला गंभीर इशारा
“…यांच्या सत्तेवर उद्या लोक थुंकतील”; मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांचा महायुती सरकारवर संताप
अमेरिका पुन्हा WHO मध्ये सामील होणार? डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले संकेत